Sarkari Naukri: भारतीय किनारपट्टीचे रक्षण करण्यासाठी सदैव तत्पर असणारे विभाग म्हणजे भारतीय नौसेना दल (Indian Navy). या दलातील 400 Sailor MR पदांसाठी 400 जागांची भरती निघाली आहे. भारतीय नौसेना दलाने नुकतच या पदांसाठी पत्रक जाहीर केले आहे. या पदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी येत्या 28 नोव्हेंबर पर्यंत अर्ज करायचा आहे. ही अंतिम तारीख असून त्यानंतर ऑनलाईन अर्ज थांबविण्यात येतील. इच्छुक उमेदवारांनी त्वरित त्यांच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन अर्ज भरावेत.
भारतीय नौदलातील सेलर एमआर या पदासाठी 400 जागांची भरती निघाली असून 28 नोव्हेंबर 2019 ही अर्ज भरण्याची अंतिम तारीख देण्यात आली आहे.
या पदासाठी उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डामधून दहावी उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे. तसेच इच्छुक उमेदवार हा 1 ऑक्टोबर 2003 ते 23 सप्टेंबर 2003 मध्ये जन्मलेला असावा. Chef, Steward आणि Hygienist या विभागात ही भरती प्रक्रिया होणार आहे. यात ऑनलाईन परीक्षा, शारीरिक स्वास्थ्य, आणि मेडिकल परीक्षा या निकषांच्या आधारावर निवड प्रक्रिया होणार आहे.
हेदेखील वाचा- Sarkari Naukri: आयुष मंत्रालयात लिपिक पदासाठी भरती, पदवीधर व 12वी उत्तीर्ण तरुणांना ccras.nic.in वर करता येणार अर्ज
कसे कराल ऑनलाईन अर्ज:
1. भारतीय नौदलाच्या joinindiannavy.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या
2. ईमेल आयडी, मोबाईल नंबर आणि अन्य माहिती भरून तुमचे रजिस्ट्रेशन करा.
3. त्यानंतर तुमच्या मेल आयडीवर एक लिंक येईल. त्या लिंकवर क्लिक केल्यास लॉग इन पेज वर जाल.
4. Log In टॅब वर क्लिक करुन तुमचा नवीन ईमेल आयडी आणि पासवर्ड टाका.
5. त्यानंतर Current Opportunities या पर्यायावर क्लिक करा
6. तेथे फॉर्म उपलब्ध होईल, तो नीट वाचून फॉर्म भरा.
त्यानंतर ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर, पेमेंट झाल्यानंतर Submit बटनावर क्लिक करा. या पदाकरिता फॉर्म भरण्याकरता 205 रुपये शुल्क आकारण्यात आले आहेत.