Sarkari Naukri: आयुष मंत्रालयात लिपिक पदासाठी भरती, पदवीधर व 12वी उत्तीर्ण तरुणांना  ccras.nic.in वर करता येणार अर्ज
आयुष मंत्रालय (File Photo)

Sarkari Naukri News: पदवीधारांसोबतच विद्यार्थ्यांसाठी थेट सरकारी विभागात नोकरी मिळवण्याची नामी संधी उपलब्ध आहे. प्राप्त माहितीनुसार, आयुष मंत्रायलयाच्या (Ayush Ministry) अंतर्गत सेंट्रल काउंसिल फॉर रिसर्च इन आयुर्वेदिक सायन्स (Central council For Research In Ayurvedic Science) विभागात लिपिक पदासाठी भरती सुरु असून यामध्ये 66 जागा उपलब्ध आहेत. याबाबत ऑनलाईन पत्रकातून घोषणा करण्यात आली असून, काल, 20 नोव्हेंबर पासून यासाठी अर्ज स्वीकारले जात आहेत. अर्जाचा अवधी 19 डिसेंबर सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत असून त्याआधी ccras.nic.in या ऑनलाईन संकेतस्थळावर इच्छुक उमेदवार अर्ज करू शकतात.

आयुष मंत्रालयाच्या अधिकृत माहितन्व्ये, लिपिक पदाच्या 66 रिक्त जागांपैकी 14 पदे ही अपर-डिवीजन लिपिक आणि 52 पदे ही लोअर डिवीजन लिपिक अशी असणार आहेत. या पदांसाठी संबंधित उमेदवारांची वयोमर्यादा 18 ते 27 वर्ष इतकी असणे गरजेचे आहे. आरक्षण नियमाच्या अनुसार वयोमर्यादा ही बदलणारी असेल. अधीकृत नोटिफिकेशन पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

शैक्षणिक पात्रता

-अपर-डिवीजन क्लर्क पदासाठी उमेदवारी दाखल करणार असल्यास उमेदवार हा मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे गरजेचे आहे.

-लोअर डिवीजन क्लर्क पदासाठी उमेदवारी दाखल करताना मान्यता प्राप्त बोर्डातून 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

-उमेदवारांच्या टायपिंग स्पीड साठी निकष असणार असून इंग्रेजी भाषेत प्रति मिनिट 35 शब्द आणि हिंदी मध्ये प्रति मिनिट 30 शब्द टाईप करता येणे आवश्यक आहे.

ccras.nic.in या संकेतस्थळांशिवाय Clerk Recruitment 2019 साठी या Direct link वर क्लिक करून देखील तुमची उमेदवारी दाखल करता येणार आहे. याठिकाणी विचारण्यात आलेली संपूर्ण माहिती सविस्तर आणि अचूक भरून सोबासाठ आवश्यक कागदपत्रे जोडायची आहेत. या प्रक्रियेत ऑनलाइन उमेदवारी अर्जासोबत काही रजिस्ट्रेशन शुल्क भरून मगच आपला अर्ज सबमिट करावा.