रुपया (Photo Credits: Unsplash)

PF Interest Rules: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) डिसेंबरअखेरीस 2019-20 या आर्थिक वर्षासाठी सुमारे सहा कोटी भागधारकांच्या ईपीएफ (एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड) खात्यात 8.5 टक्के व्याज जमा करेल. यापूर्वी आम्ही तुम्हाला अशा काही परिस्थितींबद्दल सांगणार आहोत, जेव्हा तुमच्या ईपीएफ खात्यावर व्याज मिळणे बंद होते. एकदा ईपीएफ खाते निष्क्रिय (Inoperative) झाले की, त्या तारखेच्या पुढे तुमच्या ईपीएफ खात्यावर कोणतेही व्याज दिले जात नाही. (हेही वाचा - LIC ने पॉलिसीधारकांना केलं अलर्ट; अधिकाऱ्याच्या नावाने बनावट फोन कॉलद्वारे होत आहे ग्राहकांची फसवणूक)

ईएफपीओच्या नियमांनुसार पीएफवरील व्याज मिळणे या परिस्थितीत बंद होते -

- जेव्हा एखादा कर्मचारी 55 वर्षानंतर सेवेतून सेवानिवृत्त होतो.

- जर एखादा ग्राहक कायमस्वरुपी परदेशासाठी वास्तव्यात गेल्यास.

- ग्राहकाचा मृत्यू झाल्यास पीएफवरील व्याज मिळणे थांबते.

- नोकरीच्या शेवटी जेव्हा रक्कम बाकी असेल तेव्हा 36 महिन्यांपर्यंत कोणताही तोडगा काढला नसल्यास (म्हणजे नोकरी सोडल्यानंतर 36 महिन्यांच्या आत ग्राहकाने पीएफची रक्कम काढण्यासाठी अर्ज न केल्या) (हेही वाचा - Income Tax Return फाईल करण्याची यंदाची डेडलाईन अवघ्या 4 दिवसांवर, अद्याप ITR भरला नसल्यास या गोष्टी ठेवा लक्षात)

कोरोना विषाणूच्या साथीच्या वेळी सप्टेंबरमध्ये केंद्रीय कामगार मंत्री संतोष गंगवार यांच्या अध्यक्षतेखाली विश्वस्तांच्या बैठकीत ईपीएफओने 8.15 टक्के आणि 0.35 टक्के दोन हप्त्यांमध्ये व्याज देण्याचा निर्णय घेतला. कामगार मंत्रालयाने 2019-20 साठी ईपीएफवर एकावेळी 8.5 टक्के व्याज देण्याचा प्रस्ताव अर्थ मंत्रालयाकडे पाठविला होता.