Income Tax Return फाईल करण्याची यंदाची डेडलाईन अवघ्या 4 दिवसांवर, अद्याप ITR भरला नसल्यास या गोष्टी ठेवा लक्षात

यंदा कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर टॅक्स रिटर्न भरण्यासाठी अवधी वाढवून देण्यात आला आहे. 31 डिसेंबर हा यंदाचा वर्षीचा शेवटचा दिवस आहे.

Income Tax Return फाईल करण्याची यंदाची डेडलाईन अवघ्या 4 दिवसांवर, अद्याप ITR भरला नसल्यास या गोष्टी ठेवा लक्षात
Income Tax Department | Representational Image | (Photo Credits: PTI)

वर्ष 2019-20 मध्ये कमावलेल्या पैशांमध्ये इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करण्याच्या यंदाच्या कालावधीमध्ये आता तुमच्या कडे अवघे 4 दिवस उरले आहे. दरम्यान आयकर विभागाच्या नियमानुसार, दरवर्षी विशिष्ट रक्कम कमावणार्‍यांना त्यांचा आयटीआर फाईल करणं ही बंधनकारक गोष्ट आहे. अतिरिक्त टॅक्स भरलेला असल्यास त्याचा परतावा आयकर विभाग योग्य ती कागदपत्राची छाननी करून देतो. आता आयकर रिटर्न भरण्याची सोय सुलभ झाली आहे. ऑनलाईन घरबसल्या अवघ्या काही मिनिटांत ही पूर्ण केली जाऊ शकते. यंदा कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर टॅक्स रिटर्न भरण्यासाठी अवधी वाढवून देण्यात आला आहे. 31 डिसेंबर हा यंदाचा वर्षीचा शेवटचा दिवस आहे. ITR Filing For 2019-20 यंदा 31 डिसेंबर 2020 पूर्वी भरताना लक्षात ठेवा या महत्त्वाच्या गोष्टी.

 

अद्याप इन्कम टॅक्स रिटर्न भरला नसल्यास कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाल?

  • यंदा अंतिम मुदत म्हणजेच 31 डिसेंबरच्या नंतर टॅक्स भरला गेल्यास दंड आकारला जाऊ शकतो. तुमचं इन्कम आणि किती दिवस उशिर झाला यावरून तुमची दंडाची रक्कम ठरवली जाणार आहे.
  • डेड लाईन आता अगदी जवळ आली असल्याने टॅक्स भरणार्‍यांनी तो शक्य तितका लवकर भरावा. शेवटच्या तारखेपर्यंत थांबल्यास काही चूका होण्याच्या, तांत्रिक त्रृटी, गोंधळ यामुळे त्रास होण्याची शक्यता असते.
  • शक्यतो इन्कम टॅक्स रिटर्न हा एकदाच आणि अचूक भरण्याकडे लक्ष द्या. त्यामध्ये रिव्हिजन, रेक्टिफिकेशन करत बसणं टाळा. आता शेवटच्या टप्प्यामध्ये असे प्रकार करणं यामुळे अधिक चूका, भुर्दंड पडण्याची शक्यता आहे.
  • दरम्यान ज्यांचे आयाटीआर चूकीचे असतात त्यांना आयटी विभागाकडून नोटीसा बजावल्या जातात. त्यामुळे ती एक वाढीव डोकेदुखी असू शकते.
  • यंदा 24 डिसेंबर पर्यंत सुमारे 3.97 कोटी करदात्यांनी त्यांचा आयटीआर भरला आहे. यामध्ये आयटीआर 1 चे 2.27 कोटी, आयटीआर 4 चे 85.20 लाख, आयटीआर 3 चे 46.78 लाख तर आयटीआर 2 चे 28.74 लाख आहेत.
  • आयटीआर केवळ भरणं इतकीच ही प्रक्रिया नसते तर त्याचं व्हेरिफिकेशन देखील करून घेणं आवश्यक आहे. यामध्ये विविध पर्याय आहेत. ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही प्रकारे ते केले जाऊ शकते.

करदात्यांना ई फाईलिंग केल्यानंतर इन्कम टॅक्सच्या वेबसाईटवर त्याचं स्टेटस पाहता येऊ शक्ते. यामध्ये तुम्हांला किती रूपये परतावा मिळणार आहे याची देखील माहिती मिळू शकते.

(The above story first appeared on LatestLY on Dec 28, 2020 04:37 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).