ITR Filing For 2019-20 यंदा 31 डिसेंबर 2020 पूर्वी भरताना लक्षात ठेवा या महत्त्वाच्या गोष्टी
आयटी रिटर्न 2019-20 (ITR Filing For 2019-20) भरण्यासाठीची यंदाची अंतिम मुदत 31 डिसेंबर आहे. दरवर्षी हा कालावधी 30 जून पर्यंत असतो पण यंदा कोरोना वायरस संकटामुळे त्याला मुदत वाढ देण्यात आली आहे.
आयटी रिटर्न 2019-20 (ITR Filing For 2019-20) भरण्यासाठीची यंदाची अंतिम मुदत 31 डिसेंबर आहे. दरवर्षी हा कालावधी 30 जून पर्यंत असतो पण यंदा कोरोना वायरस संकटामुळे त्याला मुदत वाढ देण्यात आली असून अजून सहा महिन्यांची मुदतवाढ जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान मुदत वाढवली आहे म्हणून अगदी शेवटच्या घटकेपर्यंत आरामात राहू नका. तांत्रिक घोळ, वेबसाईट डाऊन होणं किंवा माहिती गहाळ होणं अशा एक ना अनेक गोष्टींमुळे तुम्हांला वेळ लागू शकतो. लहान व्यापाऱ्यांना GST संदर्भात मोठा दिलासा, फक्त SMS च्या माध्यमातून भरता येणार Tax Return.
आयटी रिटर्न फाईल करण्यापूर्वी तुम्ही कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाल?
- योग्य फॉर्मची निवड करा. तुमचा आयटी रिटर्न फॉर्म भरताना योग्य फॉर्मची निवड करणं देखील तितकेच महत्त्वाचे आहे. चूकीचा फॉर्म भरल्यास तुमचं आयटी रिटर्न अपात्र ठरवलं जाईल.
- असेसमेंट इयर योग्य भरणं आवश्यक आहे. यंदा तुम्ही आयटी रिटर्न 2019-20 चा भरत असलात तरीही तुमचं असेसमेंट इयर 2020-21 आहे हे लक्षात ठेवा. यामध्ये चूक केल्यास तुमचा टॅक्स रिफंड येण्यास उशिर होऊ शकतो.
- मागील वर्षभरातील तुमचं इन्कम दाखवण्यामध्ये चूक करू नका. अनावधानानेदेखील काही राहिल्यास तुम्हांला इन्कम टॅक्स विभागाकडून नोटीस येऊ शकते.
- इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केल्यानंतर तुम्हांला त्याची व्हेरिकेशन प्रोसेस देखील पडताळून घेणं आवश्यक आहे. आयटी रिटर्न फाईल केल्यानंतर तुम्हांला 120 दिवसांमध्ये तो वेरिफाय करणं आवश्यक आहे. ही प्रक्रिया इलेक्ट्रॉनिक पद्धतीने किंवा बेंगलूरू कार्यालयात पोस्टाने पाठवून देखील करता येऊ शकते.
जर करदात्यांनी 31 डिसेंबर नंतर रिटर्न फाईल केल्यास त्यांना 10 हजाराचा फटका बसण्याची शक्यता आहे. ही रक्कम लेट फीच्या स्वरूपात भरावी लागणार आहे. ज्यांचं इन्कम 5 लाख पेक्षा जास्त नाही त्यांना लेट फी म्हणून 1 हजार रूपये भरावे लागतील.
(The above story first appeared on LatestLY on Dec 07, 2020 11:41 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

