नववर्ष 2022 चे स्वागत करताना नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवसापासून होत असलेल्या बदलांकडेही लक्ष द्या. आजपासून बदलणाऱ्या नियमांमुळे ग्राहक म्हणून वावरणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावरील भार वाढणार आहे. प्रामुख्याने बँक व्यवहारांशी संबंधित असलेले अनेक नियम बदलत आहेत. अर्थातच हे नियम काही मंडळींच्या फायद्याचे असले तरी अनेकांसाठी भुर्दंड वाटावे असेच आहेत. नव्या बदलांमुळे एटीएम व्यवहार ( ATM Transactions), ऑनलाईन फूड डिलिव्हरी (Online Food Delivery) यांसारख्या सेवा महागणार आहेत. तर, बँक लॉकर (Bank Locker) नुकसानभरपाईबाबत ग्राहकाला दिलासा मळणार आहे. जाणून घ्या विस्ताराने.
एटीएम सेवा महागली
तुम्ही जर एटीएममधून वारंवार पैसे काढत असाल तर हा नियम तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. आजपासून प्रत्येक बँकेने आपल्या ग्राहकांसाठी मोफत ट्रांझेक्शन संख्येची मर्यादा ठरवून दिली आहे. त्यामुळे विशिष्ट ट्रांजेक्शनपेक्षा अधिक वेळा तुम्ही जर एकाच महिन्यात पैसे काढले तर तुम्हाला शुल्क आकारले जाऊ शकते. त्यामुळे ग्राहकाच्या खिशाला फटका बसणार आहे. (हेही वाचा, Tax Saving Tips: 80C चा योग्य वापर करून तुमचा टॅक्स अधिकाधिक कसा वाचवू शकाल? हे घ्या जाणून)
ऑनलाई फूड डिलेव्हरी महागणार
तुम्ही जर स्विगी, झोमॅटो यांसारख्या कंपन्यांद्वारे ऑनलाईन फूड मागवत असाल तर तुम्हाला आर्थिक भार सहन करावा लागू शकतो. कारण सरकारने स्विगी, झोमॅटो यांसारख्या कंपन्यांना जीएसटीच्या (GST) कक्षेत आणले आहे. त्यामुळे या वर्षात तुमचे ऑनलाईन फूड मागवणे महागडे ठरु शकते.
लॉकरमधील वस्तू गहाळ झाल्यास दिलासा
नव्या वर्षात महागाईचा धक्का ग्राहकांना मिळाला असला तरी, लॉकरसेवेबाबत मात्र दिलासा मिळाला आहे. जसे की, यापूर्वी लॉकरमधून काही वस्तू गहाळ झाल्या, अथवा चोरीला गेल्यास पूर्वी ग्राहकाला तो भुर्दंड सोसावा लागत असे. त्याला नुकसानभरपाई मिळत नव्हती. आजपासून मात्र अशी घटना घडली तर ती जबाबदारी बँकेची असणार आहे. लॉकरमधून वस्तू, काही कागदपत्रे हरवली तर नुकसानभरपाई म्हणून बँकेला ग्राहकांना लॉकरमधील वस्तूबाबत नुकसानभरपाई द्यावी लागणार आहे. याला नैसर्गिक संकट (भूकंप, अतिवृष्टी, महापूर) अपवाद मानले गेले आहे. त्यामुळे नैसर्गिक संकटामुळे जर लॉकरमधील वस्तू गहाळ झाल्या तर ग्राहकाला नुकसानभरपाई मिळण्याची शक्यता कमी आहे.
नव्या वर्षा बऱ्याच बदलांना नागरिकांना सामोरे जावे लागणार आहे. त्यात एटीएम सुविधा, लॉकरमधील वस्तू गहाळ झाल्याबद्दल नुकसानभरपाई आणि महागलेले ऑनलाईन फूड या काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत.