Cheque Pixabay

धनादेश (Cheque) विविध प्रकारच्या व्यवहारांसाठी वापरले जातात. चेकवर बँकांद्वारे (Bank) प्रक्रिया केली जाते आणि ते दररोज सेटल केले जाते. चेक वापरुन केले जाणारे पेमेंट विश्वसनीय मानले जाते. पण हा चेक बाऊन्स झाल्यावर देखील मोठ्या तुम्हाला मोठ्या त्रासाला सामोरे जाऊ लागू शकते. चेक बाऊन्स प्रकरणी आरबीआय (RBI) आता बँका तसेच वित्तीय संस्थाच्या मदतीने एक स्टॅडर्ड प्रकिया तयार करण्याच्या विचारात आहे. ज्यामुळे चेक बाऊन्स होण्याच्या प्रकरण कमी करण्यात येतील तसेच असे करणाऱ्यांवर कठोर कारवाई देखील करण्यात येतील.

पहा व्हिडीयो -

आता चेक बाऊन्स झाल्यावर ज्या व्यक्तीचा चेक बाऊन्स झाला आहे त्याच्या दुसऱ्या अकाऊंटवरुन देखील पैसे डेबिट केले जाऊ शकतात. सीएनबीसी या वृत्तवाहिनीने या संदर्भात एक बातमी दिली आहे. चेक बाऊन्सचे वाढते प्रकार रोखण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून त्यासाठी आरबीआयच्या मदतीने अशी पॉलिसी आणत असून चेक बाऊन्स झालेल्या व्यक्तीच्या दुसऱ्या खात्यामधून त्या पैशाची वसूली केली जाऊ शकते, तसेच त्या व्यक्तीला दुसऱ्या बँकेत खाते उघडण्यावरही निर्बंध लागू शकतात तसेच त्या व्यक्तीच्या सिबील स्कोरवरही याचा परिणाम होऊ शकतो. ज्यामुळे त्या व्यक्तीला भविष्यात कुठुन लोन घेण्यासही अडचण येऊ शकते.

चेक बाऊन्स प्रकरणी सरकार आता कठोर कायदा करण्याच्या तयारीत असून लोन डिफॉल्टर्स प्रकरणाचे नियम देखील चेक बाऊन्स प्रकरणी लागू शकतात. सध्या चेक बाऊन्स प्रकरणात दंड आणि तुरुंगवासाची तरतुद आहे.