Navy Day 2018: नौसेना दिवस का साजरा केला जातो?
इंडियन नेव्ही (Photo Credit: File Photo)

देशभरात आज नौसेना दिवस (Indian Navy Day) साजरा केला जाईल. 1971 च्या युद्धात पाकिस्तानी नौसेनेवर ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर देशात नौसेना दिवसाची सुरुवात झाली. त्यानंतर भारतात 4 डिसेंबर हा दिवस नौसेना दिवस म्हणून धुमधडाक्यात साजरा केला जावू लागला. भारतीय इतिहासानुसार, भारतीय नौसेनेची सुरुवात खूप वर्षांपूर्वी झाली आहे. भारतीय नौसेनेच्या अधिकृत वेबसाईटनुसार, याची सुरुवात 1612 मध्ये झाली. मात्र याच्या नावात अनेकदा बदल करण्यात आले. नौसेनेचे शेवटचे नाव 26 जानेवरी, 1950 मध्ये बदलण्यात आले असून 'इंडियन नेव्ही' असे नामकरण करण्यात आले.

सुरुवातीचे नाव 'मरीन इंडियन'

इंग्लंडची महाराणी एलिजाबेथच्या आदेशानुसार, 31 डिसेंबर, 1600 मध्ये इस्ट इंडिया कंपनीची स्थापना करण्यात आली. यानंतर 5 सप्टेंबर, 1612 मध्ये जेव्हा कंपनी गुजरातच्या स्वालीपर्यंत पोहचली तेव्हा आपल्या जहाजांच्या सुरक्षिततेसाठी 'इंडियन मरीन' नावाच्या सुरक्षा दलाची स्थापना करण्यात आली.

1686 मध्ये 'बॉम्बे मरीन' नामकरण करण्यात आले

1686 मध्ये ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीचा व्यवसाय मुंबईत स्थलांतरीत झाला. त्यावेळी या सेनेचे नाव बदलून 'बॉम्बे मरीन' करण्यात आले. या सेनेने मराठा आणि सिंधी लोकांविरुद्धच्या युद्धात विशेष भूमिका निभावली होती.

1830 मध्ये इंडियन नेव्ही आणि 1877 मध्ये हर मजेस्टी इंडियन नेव्ही

1830 मध्ये 'बॉम्बे मरीन' हे नाव बदलून 'इंडियन नेव्ही' करण्यात आले. तर 1877 मध्ये 'हर मजेस्टी इंडियन नेव्ही' नावाने नौसेना ओळखली जावू लागली. त्यानंतर 1892 मध्ये या सेनेचे नाव 'रॉयल इंडियन मरीन' असे करण्यात आले.

अखेर 'इंडियन नेव्ही' म्हणून ओळख

1 934 मध्ये 'रॉयल इंडियन मरीन' चे 'रॉयल इंडियन नेव्ही'मध्ये एकत्रिकरण करण्यात आले. त्यानंतर यातून रॉयल हा शब्द हटवण्यात आला. 26 जानेवारी, 1950 मध्ये भारत प्रजासत्ताक झाला आणि त्यानंतर नौसेना 'इंडियन नेव्ही' म्हणून ओळखली जावू लागली.