May 2020 Bank Holiday List: महाराष्ट्र दिन ते रमजान ईद मुळे यंदा पहा कधी बंद राहणार बॅंक?
Bank Holiday | Representational Image (Photo Credits: PTI)

भारतामध्ये कोरोना व्हायरसचं संकट रोखून ठेवण्यासाठी लॉकडाऊन हा एकच पर्याय आपल्यासमोर आहे. मात्र अशा काळातही आर्थिक व्यवहार सुरळीत रहावेत यासाठी बॅंक नियमित काम करत आहे. सध्या देशात अत्यावश्यक सेवांमध्ये बॅंकांचाही समावेश करण्यात आला आहे. दरम्यान मर्यादीत कर्मचार्‍यांच्या उपस्थितीमध्ये बॅंकेचे व्यवहार सुरू आहेत. पण येत्या मे महिन्यामध्ये महाराष्ट्र राज्यासह देशभरात  बॅंकेचे व्यवहार करताना सुट्ट्यांचं गणित जरूर पहा. त्यामुळे बॅंकेची काही अत्यावश्यक कामं असतील तर ती वेळीच आटोपण्यासाठी या काही बॅंक हॉलिडेच्या तारखा नक्की लक्षात ठेवा. भारतामध्ये खरंच 13 दिवस मे 2020 मध्ये  बॅंका बंद राहणार? जाणून सोशल मीडियातील व्हायरल मेसेज मागील सत्य.

मे 2020 मध्ये यंदा महाराष्ट्र दिन, बुद्ध पौर्णिमा, रमजान ईद असल्याने सुट्ट्यांची चंगळ आहे. दरम्यान यामध्ये यंदा 5 रविवार देखिल असल्याने बॅंक बंद राहण्याच्या दिवसांमध्ये वाढ झाली आहे. दरम्यान महाराष्ट्रात यापैकी 10 दिवस बॅकेंचे व्यवहार बंद राहू शकतात.

मे 2020 मध्ये मुंबईत कधी राहणार बॅंक बंद?

1 मे, शुक्रवार - कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन

3 मे, रविवार - आठवड्याची सुट्टी

7 मे - बुद्ध पौर्णिमा

9 मे - दुसरा शनिवार

10 मे- रविवार आठवड्याची सुट्टी

17 मे - रविवार आठवड्याची सुट्टी

23 मे- चौथा शनिवार

24 मे- रविवार आठवड्याची सुट्टी

25 मे - रमजान ईद

31 मे - रविवार आठवड्याची सुट्टी

सध्या लॉकडाऊन असल्याने महाराष्ट्रामध्ये बॅंकेचे व्यवहार ऑनलाईन माध्यामातून करा असे आवाहन बॅंकांनी केले आहे. तर काही मर्यादीत वेळेसाठी आणि विशिष्ट कर्मचार्‍यांसोबत सध्या बॅंक ग्राहकांसाठी खुली ठेवण्यात आली आहे. दरम्यान काही ठिकाणी रोख रक्कम बॅंकेकडून ग्राहकांना घरपोच दिली जात आहे.