Kargil Vijay Diwas 2020: कारगिल विजय दिवसाबद्दल तुम्हाला किती माहीत आहे? MyGovIndia च्या या Quiz मधून तपासून पहा ज्ञान
Kargil Vijay Diwas (Photo Credit : Twitter)

21 st Anniversary Of Kargil Vijay Diwas 2020: 26 जुलै हा दिवस प्रत्येक भारतीयांसाठी अभिमानाचा दिवस म्हणून ओळखला जातो. भारत पाकिस्तानच्या इतिहासातील सर्वात मोठा आणि महत्वाचा दिवस म्हणजे आजचा. 1999 साली सलग 74 दिवसांच्या युद्धानंतर भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या सैन्याला गुडघे टेकायला लावून पराभूत केले होते, या शौर्याचे प्रतीक म्हणून तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) यांनी आजचा दिवस कारगिल विजय दिवस म्हणून साजरा केला जाईल अशी घोषणा केली होती. आज या घटनेला 21 वर्ष पूर्ण होत आहे त्यानिमित्ताने MYgovIndia च्या वतीने देशातील नागरिकांना व विशेषतः तरुणाईला या दिवसाविषयी किती माहिती आहे तपासण्याचे ठरवले आहे. याकरिता राष्ट्रीय स्तरावरील ऑनलाइन प्रश्नमंजुषेचे आयोजन करण्यात आले आहे.तुम्हीही यात कसे सहभागी होऊ शकता हे जाणून घ्या.

Kargil Vijay Diwas 2020: कारगिल विजय दिनानिमित्त संरक्षणमंत्री राजनाथ सिंह सह तीनही सैन्यदलाच्या प्रमुखांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकावर जाऊन शूरवीरांना दिली मानवंदना; Watch Video

MyGovIndia च्या कारगिल विजय दिवस विषयी Quiz मध्ये सहभाग घेण्यासाठी quiz.mygov.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्हाला तुमचे अकाउंट सुरु करायचे आहे. तुम्ही अगोदरच अकाउंट होल्डर असाल तर तुम्ही लॉग इन करून या प्रश्नांची उत्तरे देऊ शकतात. 60 सेकेंद म्हणजेच 1 मिनिटात सहा प्रश्नांची उत्तरे तुम्हाला द्यायची आहेत. यासाठी बहुपर्यायी उत्तरांचे प्रश्न असणार आहेत. यासाठीच्या नियम आणि अटी तुम्हाला संबधित वेबसाईटवर दिसतील. Kargil Vijay Diwas 2020: कारगिल विजय दिवसाच्या 21व्या वर्षपुर्ती निमित्त जाणून घ्या ऑपरेशन विजय विषयी 'या' खास गोष्टी

MyGovIndia ट्विट

दरम्यान, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा मन की बात कार्यक्रमातून कारगिल युद्धातील शहीद जिवांना श्रद्धांजली वाहिली होती, हल्ली युद्ध थेट घडत असताना सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा होत असतात, आपले कोणतेही वर्तन किंवा बोलणे या जवानांच्या किंवा त्यांच्या कुटुंबाच्या भावनांना दुखवणार नाही असा प्रण आपण करायला हवा असे आज या दिवसाच्या औचित्यावर मोदींनी देशवासियांना आवाहन केले आहे.