Kargil Vijay Diwas 2020: कारगिल विजय दिनानिमित्त संरक्षणमंत्री राजनाथ सिंह सह तीनही सैन्यदलाच्या प्रमुखांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकावर जाऊन शूरवीरांना दिली मानवंदना; Watch Video
Kargil Vijay Diwas (Photo Credits: ANI/Twitter)

भारताच्या इतिहासातील सोनेरी अक्षरांनी लिहावा असा हा आजचा ऐतिहासिक दिवस. सलग 74 दिवस सुरु असलेल्या भारत-पाक मधील कारगिल युद्ध हे ऑपरेशन आजच्या दिवशी यशस्वी झाले आणि भारतीय जवानांनी आपल्या प्राणांचे बलिदान देत या युद्धावर विजय मिळवला. म्हणूनच आजचा हा दिवस 'कारगिल विजय दिवस' (Kargil Vijay Diwas) म्हणून ओळखला जातो. म्हणूनच आज केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांच्यासह तीनही सैन्यदलाच्या प्रमुखांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकावर जाऊन शूरवीरांना श्रद्धांजली अर्पण करुन अनोखी मानवंदना दिली.

संरक्षण मंत्री श्रीपाद नाईक आणि नौदल, वायुदल, सैन्य दल प्रमुखांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकावर जाऊन आदरांजली वाहिली. Kargil Vijay Diwas 2020: कारगिल विजय दिवसाच्या 21व्या वर्षपुर्ती निमित्त जाणून घ्या ऑपरेशन विजय विषयी 'या' खास गोष्टी

पाहा व्हिडिओ:

कारगिल युद्धात विजय मिळवून देण्यासाठी वीरमरण आलेल्या सर्व भारतीय जवानांचे बलिदान आपल्या सर्वांसाठी एक प्रेरणा स्त्रोत राहील असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी यावेळी ANI शी बोलताना सांगितले.

तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) यांनी हा दिवस कारगिल विजय दिवस म्हणून साजरा करण्याचे ठरवले होते. आज या घटनेला 21 वर्ष पूर्ण होत आहेत.