Image Used For Representational Purpose Only (Photo Credits: PTI)

आर्थिक वर्ष 2021-22 चा आयटीआर (ITR) भरण्याचा शेवटचा दिवस हा 31 जुलै 2022 आहे. अवघ्या एका दिवसावर यंदाचा आयकर रिटर्न भरण्याचा शेवटचा दिवस येऊन ठेपला आहे. तुम्ही अजून आयटीआर भरण्याला मुदतवाढ मिळेल या आशेवर असाल तर थांबा अद्याप सरकारकडून त्याबाबतची घोषणा झालेली नाही आणि काही दिवसांपूर्वीच सांगण्यात आलेल्या माहितीनुसार सरकारचा तसा विचारही नाही. दरम्यान 31 जुलै ही अंतिम मुदत ज्या करदात्यांची अकाऊंट ऑडिट नाहीत त्यांच्यासाठी आहेत तर ज्यांची अकाऊंट्स ऑडिट होणार आहेत त्यांच्यासाठी मुदत 31 ऑक्टोबर आहे.

ज्यांची 31 जुलै ही डेडलाईन चुकणार आहे त्यांना डिसेंबर पर्यंत 5000 रूपयांपर्यतचा दंड भरावा लागणार आहे. Income Tax Act,च्या section 234F नुसार, वार्षिक उत्पन्न 5 लाख पेक्षा जास्त असणार्‍यांना डिसेंबर 31 पर्यंत आयटीआर भरल्यास 5000 रूपयांचा दंड आहे. जर 31 डिसेंबरची मुदतही पार केल्यास 10 हजार पर्यंतचा दंड आहे.

याशिवाय, जर एखादी व्यक्ती डेडलाईनच्या आत ITR दाखल करण्यात अयशस्वी झाली आणि तिच्याकडे थकबाकी न भरलेला कर असल्यास I-T कायद्याच्या कलम 234A नुसार, त्या तारखेपासून थकबाकी कराच्या रकमेवर दरमहा 1 टक्के व्याज आकारले जाते.

जर करदात्याने ITR दाखल करण्याची 31 जुलैची अंतिम मुदत चुकवली तर दंडाव्यतिरिक्त इतर फायदे देखील गमावले जातील. यामध्ये व्यवसाय ऑपरेशन्स किंवा ‘कॅपिटल गेन्स’ पर्यायांतर्गत झालेल्या नुकसानाची भरपाई करणे समाविष्ट आहे. जर आयटीआर नियोजित तारखेच्या आत दाखल केला असेल, तर सरकार त्यांना पुढील वर्षांपर्यंत पुढे नेण्याची परवानगी देते.

विलंब किंवा अयशस्वी झाल्यास प्राप्तिकर विभाग नोटीस पाठवू शकतो, ज्यामुळे तुमच्या कायदेशीर समस्या लांबू शकतात. आय-टी विभाग जर नोटीसच्या प्रतिसादावरही असमाधानी असल्यास आणि त्याच्याकडे वैध मुद्दा असल्याचे निर्धारित केल्यास न्यायालयीन खटला चालू शकतो.