IRCTC कडून नवी नियमावली जारी करण्यात आली आहे. यामध्ये रात्रीचा प्रवास करणार्यांसाठी काही नियमांमध्ये बदल करण्यात आले आहे. सरकारकडून जारी करण्यात आलेल्या या नव्या नियमांमध्ये आता प्रवाशांना रात्री नीट झोपता यावं म्हणून तरतूद करण्यात आली आहे. जर या नियमांचं तुम्ही पालन केले नाही तर तुम्हांला समस्यांना सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे.
मागील रेल्वेने जारी केलेल्या नियमांमध्ये तिकीट तपासणीसाठी रात्री 10 नंतर टीसी येऊ शकत नाही. याला जे प्रवासी रात्री 10 नंतर चढणार आहेत ते अपवाद असणार आहेत. तर मिडल बर्थ मधील प्रवासी त्यांच्या सीट वर 10-6 झोपू शकतात. जर कुणाची ट्रेन सुटली तर टीसी त्यांची जागा इतरांना देऊ शकतो. पण त्यासाठी कमाल 1 तास किंवा पुढील 2 स्टेशन्स जाणं आवश्यक आहे. यापैकी जे आधी होईल तो पर्याय निवडता येऊ शकतो. आता हे नियम कायम ठेवतच रेल्वेने आता तुमच्या सीट, कम्पार्टमेंट किंवा कोच वरील प्रवासी मोठ्या आवाजात मोबाईल वर बोलू शकत नाही किंवा मोठ्या आवाजात गाणी लावू शकत नाही. इतर सहप्रवाशांचा प्रामुख्याने वयोवृद्धांचा विचार करता हा नवा नियम करण्यात आला आहे. हे देखील नक्की वाचा: Indian Railways च्या नवाने सबसिडी किंवा बक्षिस देण्याचं आमिष दाखवणार्या बनावट वेबसाईट पासून सावधान; रेल्वे मंत्रालयाचं प्रवाशांना आवाहन .
रेल्वे प्रवासात मोठ्या आवाजात बोललं जातं, रेल्वेचा स्टाफ देखील मोठ्याने बोलतो अशा अनेक तक्रारी आल्या आहेत. रात्री 10 नंतर अनेकजण लाईट्स देखील सुरू ठेवत इतर प्रवाशांच्या झोपेचा खोळंबा करतात पण आता या नियमांची देखील पायमल्ली करणार्यांवर कारवाई होईल.
आता हेडफोन शिवाय मोठ्याने फोनवर बोलणं तुम्हांला अडचणीमध्ये आणू शकतं. रेल्वेतील कर्मचारी अशा तक्रारींवर आता लक्ष ठेवणार आहेत.