Bharat Ratna: भारत सरकारने शुक्रवारी तीन जणांना भारतरत्न पुरस्कार (Bharat Ratna Award) जाहीर केला. त्यात दोन माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंग (Chaudhary Charan Singh) आणि पीव्ही नरसिंह राव (Narasimha Rao) आणि भारताच्या हरित क्रांतीचे जनक एमएस स्वामीनाथन (MS Swaminathan) यांच्या नावांचा समावेश आहे. यापूर्वी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी (Lal Krishna Advani) आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर (Karpoori Thakur) यांना भारतरत्न देण्याची घोषणा केली होती. अशा प्रकारे एकाच वर्षात पाच जणांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान देण्याचा निर्णय घेण्याची ही पहिलीच वेळ आहे.
काय आहेत भारतरत्नाबाबत नियम ?
भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे, जो 1954 मध्ये सुरू झाला होता. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, जात, व्यवसाय, पद आणि लिंग असा भेदभाव न करता सर्व व्यक्ती या सन्मानासाठी पात्र आहेत. कोणत्याही क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कार्याचा गौरव करण्यासाठी भारतरत्न दिला जातो. भारतरत्नची शिफारस पंतप्रधान राष्ट्रपतींकडे करतात. यासाठी कोणतीही औपचारिक शिफारस आवश्यक नाही. (हेही वाचा - Bharat Ratna: चौधरी चरण सिंग, पीव्ही नरसिंह राव आणि डॉ. एमएस स्वामिनाथन यांना भारतरत्न जाहीर; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा)
एका वर्षात जास्तीत जास्त किती लोकांना भारतरत्न दिला जाऊ शकतो?
गृह मंत्रालयाने नमूद केले आहे की, वार्षिक पुरस्कारांची संख्या एका विशिष्ट वर्षात जास्तीत जास्त तीन पर्यंत मर्यादित आहे. हा पुरस्कार प्रदान करताना, प्राप्तकर्त्यास राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीचे सनद (प्रमाणपत्र) आणि एक चिन्ह दिले जाते. या पुरस्कारामध्ये कोणतेही आर्थिक अनुदान दिले जात नाही. (हेही वाचा, Bharat Ratna Award Announced to LK Advani: लालकृष्ण आडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा)
घटनेच्या कलम 18(1) नुसार, हा पुरस्कार प्राप्तकर्त्याच्या नावापुढे किंवा मागे नमूद करता येत नाही. तथापि, जर एखाद्या पुरस्कार प्राप्तकर्त्याला हे आवश्यक वाटत असेल, तर तो/ती त्याचा/तिच्या लेटर हेड किंवा व्हिजिटिंग कार्ड इत्यादींमध्ये त्याचा उल्लेख करू शकतो. प्राप्तकर्ता 'राष्ट्रपतींद्वारे भारतरत्न प्रदान केलेला' किंवा 'भारतरत्न प्राप्तकर्ता' असा उल्लेथ करू शकतो. (हेही वाचा, Karpoori Thakur यांना मरणोत्तर भारतरत्न जाहीर; आज 100 वी जयंती!)
एका वर्षात पाच जणांना भारतरत्न देण्याची पहिलीचं वेळ -
2024 पूर्वी एकूण 48 जणांना भारतरत्न देण्यात आले होते. गृह मंत्रालयाच्या वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, 1999 मध्ये चार जणांना भारतरत्न देण्यात आला होता. यामध्ये जयप्रकाश नारायण (मरणोत्तर), प्रोफेसर अमर्त्य सेन, गोपीनाथ बोरदोलोई (मरणोत्तर) आणि पंडित रविशंकर यांच्या नावांचा समावेश होता. एका वर्षात पाच जणांना देशाचा सर्वोच्च सन्मान जाहीर होण्याची ही पहिलीच वेळ आहे.