
FYJC Bifocal Merit List 2019: राज्यात नुकाच दहावीचा निकाल लागला. परंतु यंदा दहावीच्या निकालाचा (SSC Results) टक्का घसल्याचे पाहायले मिळाले. परंतु आता विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशाची उत्सुकता लागली आहे. तर आज (25 जून) ज्युनियर कॉलेजांमध्ये बायफोकल विषयांसाठी (FYJC Bifocal Merit List) अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची पहिली मेरीट लिस्ट रात्री 8 वाजताच्या नंतर जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी ही लिस्ट शिक्षण मंडळाच्या वेब पोर्टलवर पाहायला मिळणार आहे.
परंतु याआधी संध्याकाळी 6 वाजता ऑनलाईन पद्धतीने मेरीट लिस्ट पाहता येणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र आता वेळेत बदल करण्यात आला असून रात्री 8 वाजताच्या नंतर वेबसाईटवर दाखवण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांनी वेबपोर्टलवर पार्ट 1 आणि पार्ट 2 यशस्वीरित्या भरला आहे. त्यांना सेंट्रलाईज्ड अॅडमिशन प्रोसेसनुसार त्यांची नावं यादीमध्ये पाहता येणार आहेत.ज्या विद्यार्थ्यांची आजच्या बायफोकल यादीमध्ये नावं जाहीर होणार त्यांच्यासाठी कागदपत्रांची छाननी, प्रवेश शुल्क भरण्यासाठी 26 आणि 27 जूनपर्यंत अवधी देण्यात आला आहे.

इथे पहा पहिली मेरीट लिस्ट आणि वेळ
>mumbai.11thadmission.net : रात्री 8 वाजता
>pune.11thadmission.net : रात्री 9 वाजता
>nagpur.11thadmission.net : रात्री 9 वाजता
बायफोकलनंतर पहिली जनरल मेरीट लिस्ट 6 जुलै दिवशी संध्याकाळी सहा वाजता वेबपोर्टलवर जाहीर होणार आहे. यंदा 8 जूनला दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला. त्यानंतर अंतर्गत मार्कांच्या गोंधळावरून 11वीची प्रवेशप्रक्रिया रेंग़ाळली होती.
11 वी प्रवेशप्रक्रियेसाठी दुसरी मेरीट लिस्ट 15 जुलैला जाहीर होणार आहे. तर तिसरी यादी 23 जुलै आणि चौथी व अंतिम यादी 31 जुलैला जाहीर होईल. प्रत्येक कॉलेजमध्ये 70% जागा भरल्यानंतर यंदाचे 11 वी चे वर्ग सुरू होणार आहेत. अंतर्गत मार्कांच्या गोंधळामुळे यंदा राज्य सरकारने तुकड्यांच्या संख्या वाढवल्या आहेत.