Result (Photo Credits: PTI)

अंतर्गत मार्कांच्या गोंधळामुळे महाराष्ट्र राज्य बोर्ड आणि इतर बोर्डाच्या विद्यार्थ्यांमधील मार्कांची तफावत असल्याने 11 वी प्रवेशप्रक्रिया रेंगाळली होती. मात्र महाराष्ट्र सरकारने तुकड्यांची संख्या वाढवत आता प्रवेशप्रक्रिया सुरू केली आहे. यामध्ये 19 जूनपासून ऑनलाईन पोर्टलवर पार्ट 2 फॉर्म भरण्यास सुरूवात झाली आहे. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन माध्यमातून फॉर्म भरल्यानंतर त्यांना सुरूवातील प्रोव्हिजनल आणि त्यानंतर जनरल मेरीट दाखवली जाणार आहे. यंदा चार मेरीट लिस्ट जाहीर होणार आहे. 11वी प्रवेश प्रक्रियेला  सुरुवात, एका क्लिक वर जाणून घ्या सविस्तर वेळापत्रक

Provisional Merit List कशी पाहाल?

  • mumbai.11thadmission.net या ऑफिशिअल वेबसाईट ओपन करा.
  • त्यानंतर USER ID आणि PASSWORD भरा.
  • अत्यावश्यक माहिती भरल्यानंतर Login वर क्लिक करा.
  • Latest Notifications च्या विंडोमध्ये Provisional Merit List 2019 चा पर्याय तुम्हांला दिसेल.
  • अशाप्रकारे तुम्हांला जनरल मेरीट लिस्ट पाहता येईल.

ज्या विद्यार्थ्यांना चारही फेर्‍यांनंतर प्रवेश मिळणार नाही त्यांच्यासाठी मंडळाकडून FCFS म्हणजेच प्रथम येण्यास प्राधान्य अशा तत्त्वावर अ‍ॅडमिशन खुलं केलं जाणार आहे.