Representational Image (Photo Credits: PTI)

मुंबई: दहावीचा निकाल लागल्यावर आज 19 जून पासून मुंबईत अकरावी प्रवेश प्रक्रियेला (11th Online admission)  सुरवात होणार आहे. ही प्रक्रिया संपूर्णपणे ऑनलाईन असून केंद्रीय प्रवेश नियंत्रण समितीच्या उपसंचालक कार्यालयाकडून यासंबंधी वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या कमी झालेल्या टक्केवारीमुळे अकारावीत प्रवेश घेताना  महाराष्ट्र बोर्डाच्या विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये, यासाठी अकरावी प्रवेशात आर्टस्, कॉमर्स आणि सायन्स,  शाखेच्या जागांमध्ये वाढ करण्यात आल्याची माहिती राज्याचे नवे शिक्षणमंत्री अॅड. आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी विधानसभेत दिली होती त्याप्रमाणे या वाढीव जागांसाठी आजपासून अकरावीचे प्रवेशसत्र सुरु होणार आहे.

अकरावीत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना 19 ते 23 जून दरम्यान अर्जाचा दुसरा भाग भरता येणार आहे.तसेच ज्या विद्याथ्यार्नी याआधी आर्टस्, कॉमर्स आणि सायन्स, तसेच एमसीव्हीसीसाठी अर्जाचा पहिला भाग भरला नाही, त्यांनाही आता अर्ज भरण्याची मुदत देण्यात आली आहे.प्रवेश अर्जाची मुदत संपल्यावर 25 जून ला बायफोकल यादी व त्यापाठोपाठ 1जुलै ला साधारण गुणवत्ता यादी तर 6  जुलै ला पहिली गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे. वेळापत्रकाच्या मध्ये ज्युनिअर कॉलेज व्यवस्थापन आणि इनहाउस कोट्यातील जागा केव्हाही करू समर्पित शकणार आहेत, तर अल्पसंख्यांक कॉलेज त्यांचा अल्पसंख्यांक कोटा तिसऱ्या गुणवत्ता यादीनंतरच समर्पित करता येतील

असे आहे वेळापत्रक... 

  • 19 ते 23 जून, 2019 - बायफोकल, कला, वाणिज्य आणि विज्ञान प्रवेशासाठी अर्ज, पसंतीक्रम भरणे, कॉलेजांनी कोट्यातील प्रवेश पूर्ण करणे. बायफोकल वगळता इतर शाखांचे ऑनलाईन प्रवेश अर्ज सादर करावे.
  • 19 ते 29 जून, 2019 - (सायंकाळी 5 वाजेपर्यंत) - सर्व शाखा आणि बायफोकल यामध्ये भाग 1 आणि भाग 2  अर्ज भरणे.
  • 25 जून, 2019 - (6  वाजता) बायफोकलची पहिली गुणवत्ता यादी जाहीर होईल .
  • 26 आणि 27 जून, 2019- (सकाळी 11ते सायंकाळी 5)  बायफोकल विषयाच्या पहिल्या यादीतील नावांना ऑनलाईन प्रवेश घेता येणार
  • 1  जुलै, 2019 - (सकाळी 11) सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर.
  • 2 ते 3 जुलै 2019 - (सकाळी 10 ते सायंकाळी 5) अर्जाची पुनर्तपासणी करणे आणि हरकती निवारण करता येणार .
  • 6 जुलै, 2019- (सकाळी 11)  पहिली गुणवत्ता यादी जाहीर करणार
  • 8 जुलै ते 9  जुलै, 2019 - (सकाळी 11 ते सायंकाळी 5) पहिल्या गुणवत्ता यादीनुसार प्रवेश घेणे.
  • 10 जुलै, 2019 - (सकाळी 11 ते 3)  पहिल्या गुणवत्ता यादीनुसार प्रवेश घेणे.
  • 10 जुलै, 2019-(7  वाजता) शिल्लक जागांचा आढावा घेतला जाणार .
  • 11 आणि 12 जुलै 2019 (सकाळी 11 ते सायंकाळी 5) अर्जाचा भाग भरण्यासाठी आणि दुरुस्तीसाठी वेळ मिळणार
  • 15 जुलै, 2019  (संध्याकाळी 6) दुसरी गुणवत्ता यादी जाहीर होणार .
  • 16 जुलै, 17 जुलै, 2019 - (सकाळी 11 ते सायंकाळी 5) दुसऱ्या गुणवत्ता यादीनुसार प्रवेश घेणे.
  • 18 जुलै, 2019 - (सकाळी 11 ते 3)  दुसऱ्या गुणवत्ता यादीनुसार प्रवेश घेणे.
  • 18 जुलै, 2019 - (7 वाजता)  शिल्लक जागांचा तपशील जाहीर होणार.
  • 19 ते 20 जुलै, 2019 - (सकाळी 11 ते 5 पर्यंत)  अर्जाचा भाग - 1  आणि भाग 2  भरण्यासाठी आणि दुरुस्तीसाठी उपलब्ध.
  • 23 जुलै, 2019 - (संध्याकाळी 6) तिसरी गुणवत्ता यादी जाहीर करणे.
  • 24 जुलै आणि 25 जुलै, 2019 - (सकाळी 11 ते सायंकाळी 5) तिसऱ्या गुणवत्ता यादीनुसार प्रवेश घेणे.
  • 26 जुलै, 2019 - (सकाळी 11 ते 3)  तिसऱ्या गुणवत्ता यादीनुसार प्रवेश घेणे.
  • 26 जुलै, 2019 - (संध्याकाळी 7 वाजता) रिक्त जागांचा तपशील जाहीर करणे आणि दुसऱ्या फेरीचा कट ऑफ जाहीर होणार .
  • 27 जुलै, 2019- (सकाळी 11 ते 5) अजार्चा भाग 1 आणि भाग 2 भरण्यासाठी तसेच दुसऱ्या भागातील दुरुस्तीसाठी वेळ.
  • 31 जुलै, 2019 - (संध्याकाळी 6 वाजता)  विशेष गुणवत्ता यादी जाहीर करणे.
  • 1 आणि 2 ऑगस्ट , 2019 - (सकाळी 11 ते 5 पर्यंत)  विशेष गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश.
  • 3 ऑगस्ट , 2019 - (सकाळी १०) रिक्त जागांचा तपशील जाहीर करणे.

शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांच्याकडून करण्यात आलेल्या घोषणेनुसार 2019 -20 या शैक्षणिक वर्षात अकरावीसाठी एकूण 6622 जागांची वाढ करण्यात येणार आहे. यामध्ये आर्ट्स शाखेत 1153 जागांची, कॉमर्स शाखेत 4226 जागांची तर विज्ञान शाखेत 1243 जागांची वाढ प्रस्तावित आहे.