Domestic Flights Resumption: कोरोना व्हायरसशी सामना करणार्या भारतामध्ये आता दीड ते दोन महिने ठप्प पडलेली प्रवासी विमानसेवा येत्या 25 मे पासून भारतामध्ये देशांर्गत सुविधा पुन्हा सुरू करण्यासाठी सज्ज झाली आहे. आज सकाळी AAI कडून प्रोटोकॉल जारी करण्यात आल्यानंतर आता Ministry of Civil Aviation कडून विमान कंपनी आणि प्रवाशांसाठी काही गाईडलाईन प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. दरम्यान देशांर्तगत सुरू होणार्या या प्रवासी वाहतूकीदरम्यान आरोग्य सेतू अॅप वापरणं बंधनकारक असेल पण त्यासोबतच प्रवाशांना self-declaration form भरून द्यायचा आहे. ज्यामध्ये त्यांना मागील 2 महिन्यात कोरोना व्हायरसची लागण झालेली नाही. असं स्पष्ट करायचं आहे.
दरम्यान आरोग्य सेतू अॅप किंवा Self Declaration Form ची माहिती प्रवाशांनी दिल्यानंतरच त्यांना Web Check in किंवा Tele Check In करता येईल अशी व्यवस्था करण्याचे विमान कंपन्यांना आदेश असतील.
प्रवासी विमान सेवेदरम्यान प्रवाशांना कशाची मुभा असेल आणि कशावर बंदी?
- एअरपोर्टवर फिजिकल चेक ईन उपलब्ध नसेल.
- केवळ ज्यांचे Web Check in यशस्वी झाले असेल त्यांना विमानतळावर प्रवेश मिळेल.
- Check in च्या वेळेस केवळ एक बॅग घेऊन जाण्यास परवानगी असेल.
- विमानदराबाबत सरकाराने आखून दिलेल्या किंमतीमध्ये तिकीट आकारलं जावं
- प्रवाशांना आरोग्य सेतू अॅप वापरणं बंधनकारक असेल.
- प्रवाशांना फेस मास्क लावणं आवश्यक आहे.
- प्रवासादरम्यान जेवण किंवा खाद्य पदार्थ दिले जाणार नाहीत.
- प्रवासादरम्यान न्यूज पेपर, मॅग्झीन दिले जाणार नाहीत.
- विमान उड्डाणापूर्वी 60 मिनिटं बोर्डिंग सुरू होईल.
- विमान उड्डाणापूर्वी 20 मिनिटं बोर्डिंग गेट बंद होतील.
इथे पहा संपूर्ण नियमावली
Ministry of Civil Aviation issues general instructions for domestic travellers. Only those passengers with confirmed web check-in will be allowed to enter the airport. Passengers will be required to wear protective gear (face mask). Only one check-in bag will be allowed. pic.twitter.com/EVFrOnLgzs
— ANI (@ANI) May 21, 2020
दरम्यान आज सकाळी Airports Authority of India कडून प्रोटोकॉल जाहीर करताना विमान उड्डाणापूर्वी 2 तास आधी विमानतळावर पोहचणं आवश्यक आहे. त्यावेळेस प्रवाशांना फेस मास्क, हॅन्ड ग्लोव्ह घालणं आवश्यक आहे. 14 वर्षाखालील मुलं वगळता इतरांना आरोग्य सेतू वापरणं बंधनकारक असेल. गेटवरच अधिकारी त्याचं रजिस्ट्रेशन केले आहे की नाही याची तपासणी देखील करणार आहेत.
भारतामध्ये काही दिवसांपूर्वी स्थलांतरित मजुरांसाठी श्रमिक स्पेशल ट्रेन सोबत आता प्रवासी ट्रेनदेखील सुरू करण्यात आल्या आहेत. सुरूवातीला 15 आणि आता 100 वेगवेगळ्या मार्गावर प्रवासी रेल्वे वाहतूक सुरू झाली आहे. दरम्यान अद्याप भारतातील कोरोना व्हायरसचा धोका टळलेला नाही. देशात 1 लाखापेक्षा जणांना कोरोनाची लागण झाली आहे. मात्र आता अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी हळूहळू पण खबरदारीपूर्वक काही गोष्टींमध्ये शिथिलता देण्यास सुरूवात झाली आहे.