भारताच्या नागरी उड्डाण मंत्रालयाकडून काल (20 मे) संध्याकाळी देशांर्गत विमान सेवा 25 मे पासून पुरेशी खबरदारी घेत सुरू करण्यात येत आहे ही माहिती देण्यात आल्यानंतर आज Airports Authority of India कडून विमान प्रवाशांसाठी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. भारतामध्ये लॉकडाऊन चौथ्या टप्प्यामध्ये पोहचला आहे. सुमारे 2 महिने ठप्प असलेली विमानसेवा आता हळूहळू सुरू केली जाणार आहे. मात्र त्यासाठी यंत्रणेसोबतच नागरिकांनादेखील काही नियम पाळण्याचे आवाहन सरकार कडून करण्यात आले आहेत. यामध्ये रेल्वे प्रवासी वाहतुकीच्या नियमावलीप्रमाणेच विमानप्रवासादरम्यान आरोग्य सेतू अॅप (Aarogya Setu app) बंधनकारक, थर्मल चेकिंग अशा महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. PM नरेंद्र मोदी यांनी भारतीयांना Aarogya Setu App डाऊनलोड करण्याचे केले आवाहन; जाणून घ्या या अॅपच्या मदतीने कोरोना संशयित रूग्ण ओळखण्यास कशी होते मदत?
भारतामध्ये अद्याप आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्याबाबत घोषणा केलेली नाही मात्र परदेशात अडकलेल्या भारतीयांना वंदे भारत या विशेष सुविधे अंतर्गत मायदेशी परत आणले जात आहे. त्यामुळे जाणून घ्या भारतात 25 मे पासून सुरू होणार्या देशांर्गत विमानप्रवासादरम्यान कोणते नियम बंधनकरक असतील?
- 14 वर्षाखालील मुलं वगळता प्रवाशांना Aarogya Setu app वापरणं बंधनकारक असेल.
- विमान उड्डाणापूर्वी 2 तास आधी विमानतळावर पोहचणं आवश्यक आहे.
प्रवाशांना फेस मास्क, हॅन्ड ग्लोव्ह घालणं आवश्यक आहे.
- पुढील 4 तासामध्ये ज्यांची विमानं असतील त्यांना टर्मिनल बिल्डिंगमध्ये प्रवेश दिला जाईल.
- विमानतळाच्या गेटवरील CISF जवान प्रवाशाने आरोग्य सेतू अॅप रजिस्टर केले आहे की नाही हे तपासून पाहील.
- एअरपोर्ट टर्मिनलच्या बिल्डिंगमध्ये प्रवेश करण्यापूर्वी प्रवाशांना thermal screening zone मधून जावं लागेल.
इथे पहा सविस्तर नियमावली
It shall be verified by the Central Industrial Security Force/Airport staff at the entry gate. However, Aarogya Setu is not mandatory for children below the age of 14 years: Airports Authority of India (AAI) https://t.co/4X1GGDipDx
— ANI (@ANI) May 21, 2020
भारतामध्ये कोरोनाबाधितांचा आकडा 1 लाखाच्या पार गेला आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाबाधित रूग्ण आहेत. मात्र मागील दोन महिन्यांपासून रूतलेली अर्थव्यवस्था पुन्हा सुरू करण्यासाठी तसेच आरोग्य यंत्रणेवरील भार वाढणार नाही याची काळजी घेत अत्यंत सावधपणे सरकारकडून रेल्वे आणि विमान प्रवासी वाहतूक सुरू केली जात आहे.