Railway | Image used for representational purpose | (Photo Credits: Facebook)
सणासुदीच्या काळात महत्वाच्या मार्गावरुन रेल्वेच्या तिकिटाबाबत प्रश्नचिन्ह उभा राहतो.पण रेल्वेच्या तिकिटावर मात्र वेटिंग लिस्ट फारच लांबच होत चालली आहे. यामुळे प्रवाशांना दिलासा देण्यासाठी काही विशेष रेल्वे सुरु करण्यात येणार असल्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने जाहीर केला आहे. उत्तर रेल्वेने मुंबई, जम्मू, गुजरात आणि बिहार येथून 20 स्पेशल ट्रेनची घोषणा केली आहे.
मुंबई सेंन्ट्रल ते नवी दिल्लीसाठी रेल्वे (क्रमांक- 82905) 20 ऑक्टोंबर पासून ते 19 नोव्हेंबर दरम्यान शुक्रवार, रविवार आणि मंगळवारी चालवण्यात येणार आहे. तसेच नवी दिल्ली येथून ते मुंबई सेंन्ट्रल पर्यंत रेल्वे (क्रमांक-09006) शनिवार, सोमवार आणि बुधावारी धावणार आहे. मात्र या दोन्ही स्पेशल रेल्वेचे तिकिट चार्ज वेगळा असणार आहे.
- मुंबईआणि जम्मू तवी दरम्यान (क्रमांक- 09021/09022) साप्तहिक रेल्वे धावणार आहे. वांद्रे येथून ही रेल्वे सोमवार आणि जम्मू तवी येतून बुधावारी सुटणार आहे. पण नवी दिल्ली येथून ही रेल्वेने जाणार आहे.
-उधना येथून छपरा पर्यंत साप्तहिक रेल्वे सुरु करण्यात येणार आहे. 82911 क्रमांकची रेल्वे उधना येथून 20 ऑक्टोंबर ते 19 नोव्हेंबर पर्यंत प्रत्येक मंगळवारी धावणार आहे.
तसेच रेल्वेने तिकिट आरक्षणाबाबत सुद्धा बदल केला आहे. त्यानुसार तिकिट रद्द केल्यास कोणत्या गोष्टीसाठी किती रुपये चार्ज स्विकारला जाणार याबद्दल अधिक माहिती दिली आहे. याबाबत अधिक सुचना आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन दिली आहे. त्यामुळे प्रवाशांनी याबाबत लक्ष द्यावे असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.