रेल्वे तिकीट आरक्षणासाठी नियमात बदल, जाणून घ्या कोणत्या गोष्टीसाठी किती रुपये स्विकारणार
Indian Railways (Photo Credits: PTI)

रेल्वेने दररोज 2 कोट्यावधीन नागरिक प्रवास करतात. मात्र रेल्वे किंवा तिकिट रद्द झाल्यास त्याबाबत प्रश्न उद्भावतो. त्यामुळे या समस्येचे निवारण करण्यासाठी आता आयआरसीटीसी आणि रेल्वे तिकिट संर्भातील नियमात बदल करण्यात आला आहे. रेल्वे तिकिट रद्द करणे किंवा रिफंड बाबत नेहमीच गोंधळ होते. तिकिट कोणत्या क्लासचे आहे किंवा रेल्वे येण्याआधी किती वेळात ते रद्द केले यावर प्रवाशाला मिळणाऱ्या रिफंडची रक्कम ठरलेली असते. तर जाणून घ्या रेल्वे प्रशासनाकडून तिकिट रद्द केल्यास किती रुपये कापून तुम्हाला रिफंड म्हणून दिले जातात.

जर तुमच्याकडे रेल्वेचे आरक्षित केलेले तिकिट कन्फर्म असल्यास आणि तुम्ही 48 तासापूर्वी तिकिट रद्द केल्यास AC फर्स्ट क्लास/एक्झीक्युटिव्ह क्लाससाठी 240 रुपये चार्ज स्विकारला जाणार आहे. तसेच सेकेंड AC टीयर/फर्स्ट क्लाससाठी 200 रुपये आकारण्यात येतील. AC 3 टीयर/ AC 3 इकॉनॉमी/ AC चेअर कारसाठी 180 रुपये तिकिट रद्द केल्यास स्विकारले जाणार आहेत. त्याचसोबत स्लीपर क्लाससाठी 120 रुपये आणि सेकेंड क्लाससाठी 60 रुपये द्यावे लागणार आहेत. स्विकारण्यात येणारी रक्कम ही प्रति व्यक्तीनुसार वसूल केली जाते. जर तिकिट दोन व्यक्तींसाठी आरक्षित केलेले असल्यास त्यासाठी वेगळा चार्ज द्यावा लागणार आहे.

रेल्वे येण्याच्या 48 किंवा 12 तासपूर्वी तिकिट रद्द केल्यास तिकिटावर 25 टक्के चार्ज लावण्यात येतो. तसेच 12 तास ते 4 तासांपूर्वी तिकिट रद्द केल्यास त्यावर 50 टक्के चार्ज लावतात. परंतु जर एखाद्या प्रवाश्याने 4 तासांपूर्वी तिकिट रद्द केल्यास त्याल्या तिकिटामधील कोणतेही पैसे परत मिळणार नाहीत. त्याचसोबत जर तुमच्याकडे ई-तिकिट असून रेल्वे रद्द झाल्यास त्यासाठी टीडीआर फाइल करण्याची गरज नाही. कारण तुम्हाला तिकिटाचे रिफंड बँक खात्यात पुन्हा मिळणार आहे.(ट्रेनमध्ये चोरी झाल्यास दाखल करता येणार तक्रार, प्रवाशांसाठी GRP सहयात्री अ‍ॅप लॉन्च)

तर नव्या नियमानुसार प्रवाश्याजवळ तत्काळमध्ये काढलेली तिकिट कन्फर्म असून रेल्वे उशिराने आली किंवा तुम्हाला त्यावेळी प्रवास करणे रद्द करायचा झाल्यास तुम्ही टीडीआर फाइल करु शकता. मात्र टीडीआर फाइल न केला नाही तर कोणतेही पैसे तुम्हाला परत मिळणार नाहीत. तसेच जर तुमच्याकडे ई-तिकिट आणि तुम्ही वेटिंगवर असल्यास तुम्हाला प्रवास करता येणार नाही. कारण या तिकिटाने प्रवास केल्यास तुमच्याकडे अवैध तिकिट असल्याचे मानले जाणार आहे.