डेबिट कार्ड (Debit Card) आणि क्रेडिट कार्ड (Credit Card) धारकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. आरबीआयच्या नव्या नियमावलीनुसार, ऑनलाईन सुरक्षित व्यवहारांसाठी ते युनिक टोकन सोबत रिप्लेस केले जाणार आहेत. यासाठी 30 सप्टेंबर ही मुदत देण्यात आली आहे. जुलै 2022 ची असलेली अंतिम मुदत आता वाढवून सप्टेंबर 30 करण्यात आली आहे. त्यामुळे आता पुढील महिन्यापर्यंतच तुम्हांला तुमची क्रेडीट कार्ड, डेबिट कार्ड्स टोकनाईज्ड करण्याची संधी आहे.
आरबीआय कडून जशी अंतिम तारीख वाढवण्यात आली तशी नोटिफिकेशन पाठवून ही प्रक्रिया पूर्ण करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ग्राहकांनी त्यांची क्रेडीट आणि डेबिट कार्ड्स कशी टोकनाईज्ड करायची आहेत त्याची माहिती देणारं ट्वीटही शेअर केले आहे.
टोकनायाझेशन म्हणजे काय?
आरबीआयच्या माहितीनुसार, टोकनायझेशनच्या माध्यमातून कार्डसचे तपशील एका पर्यायी कोड ने बदलले जाणार आहेत. त्याला 'टोकन' म्हटले जाते. यामध्ये मर्चंट्स आणि पेमेंट अॅग्रिगेटर्सना क्रेडिट, डेबिट कार्डचे तपशील हटवावे लागणार आहेत. त्याच्या ऐवजी नवा टोकन असेल.
टोकनायझेशनचे फायदे काय?
आरबीआयच्या माहितीनुसार टोकनायझेशन मुळे ग्राहकांचे ऑनलाईन व्यवहार सुरक्षित होतील. ऑनलाइन फ्रॉड करणार्यांना यामुळे ग्राहकांच्या कार्ड्सचे तपशील दिसणार नाही. त्यामुळे मोठा आर्थिक फटका वाचू शकतो. नक्की वाचा: Cyber Crime: आंतरराष्ट्रीय क्रेडिट कार्डची ऑफर देत मुंबईतील व्यावसायिकाला घातला 4.20 लाखांचां गंडा .
Debit Card, Credit Card टोकनाईज्ड कसे कराल?
- ज्या ई कॉमर्स, मर्चंट वेबसाईट, मोबाईल अॅप वरून तुम्ही खरेदी करणार आहे त्याला भेट द्या. खरेदी केल्यानंतर पेमेंट करायला सुरूवात करा.
- चेक आऊट करताना तुमच्या कार्डस चे डिटेल करा. तुमच्या कार्ड्स चे डिटेल्स सेव्ह असतील तर ते निवडा.
- “secure your card as per RBI guidelines” किंवा “tokenise your card as per RBI guidelines” यावर क्लिक करा.
- टोकन बनवण्याला परवानगी द्या. आता तुमच्या मोबाईल किंवा इमेल वर आलेला ओटीपी एंटर करा.
- आता तुमचा टोकन तयार झाल्यानंतर कार्ड्सचे प्रत्यक्ष डिटेल्स दिसणार नाहीत.
- आता पुढील व्यवहारांच्या वेळेस केवळ कार्ड्सचे शेवटचे 4 अंक दिसतील ज्याद्वारा तुम्ही कार्ड्स ओळखू शकता.एक टोकन फक्त एका कार्डासाठी आणि एका व्यापाऱ्यासाठी वैध आहे. तुम्ही तुमचे क्रेडिट कार्ड एका ई-कॉमर्स साइटसाठी टोकनाइज केल्यास, त्याच कार्डावर दुसऱ्या साइटवर वेगळे टोकन असेल. हे फसवणूक टाळण्यासाठी आहे. याव्यतिरिक्त, आपण व्यवहार करण्यासाठी कोणत्याही कार्डवर टोकनची विनंती करू शकता.