CRPF Recruitment 2023: सीआरपीएफ मध्ये 1458 जागांसाठी नोकरभरती जाहीर;  crpf.nic.in वर 25 जानेवारी पर्यंत करता येणार अर्ज
Job | Representational Image (Photo Credits: Pixabay)

सेंट्रल रिझर्व्ह पोलिस फोर्स (The Central Reserve Police Force ) कडून नोकरभरतीसाठी नोटीफिकेशन जारी करण्यात आलं आहे. विविध पदांकरिता जारी नोकरभरती मध्ये यंदा ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत. त्यासाठी CRPF ची अधिकृत वेबसाईट crpfindia.com किंवा crpf.nic.in ला भेट द्यावी लागणार आहे.

सीआरपीएफअच्या नोकरभरतीसाठी अर्ज प्रक्रिया 4 जानेवारी 2023 पासून सुरू करण्यात आली आहे. 25 जानेवारी ही या ऑनलाईन अर्जप्रक्रियेची अंतिम तारीख आहे. दरम्यान यासाठी अ‍ॅडमीट कार्ड/हॉल तिकीट 15 फेब्रुवारी दिवशी जारी केले जाणार आहे. सध्याच्या तात्पुरत्या वेळापत्रकानुसार, परीक्षा 22 ते 28 फेब्रुवारी दरम्यान घेतली जाईल. नक्की वाचा: TCS मध्ये 2024 नव्या आर्थिक वर्षामध्ये करणार 1.25 लाख कर्मचार्‍यांची भरती.

एकूण 1458 जागांवर नोकरभरती केली जाणार आहे. Assistant Sub Inspector (Steno) यांच्या 143 जागा तर Head Constable (Ministerial) साठी 1315 जागा असणार आहेत. सातव्या वेतन आयोगानुसार, Assistant Sub Inspector (Steno)यांचा पगार Rs 29,200 ते Rs 92,300 या पे स्केल मध्ये असणार आहे तर Head Constable (Ministerial) यांचा पगार Rs 25,500 to Rs 81,100 या पे स्केलमधील असेल.

अर्ज करणार्‍या उमेदवाराचं वय किमान 18 वर्ष तर कमाल 25 वर्ष असणं अपेक्षित आहे. उमेदवार 26 जानेवारी 1998 ते 25 जानेवारी 2005 मध्ये जन्मलेला असावा. पण SC/ST/OBC, Ex Servicemen यांना सरकारी नियमानुसार वयामध्ये शिथिलता मिळणार आहे. उमेदवाराचं शिक्षण किमान 10+2 उत्तीर्ण असावं.

उमेदवाराची निवड करताना कम्प्युटर बेस्ड टेस्ट द्यावी लागणार आहे. ही परीक्षा इंग्लिश, हिंदी भाषेमध्ये देता येणार आहे. त्यासोबतच स्किल टेस्ट, फिजिकल स्टॅन्डर्ड टेस्ट, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल टेस्ट या सार्‍यांमधून पार झाल्यानंतर अंतिम निवड होणार आहे.