Coronavirus | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

What To Do During Lockdown: कोरोना व्हायरस (Coronavirus) नियंत्रणात आणण्याच्या पार्श्वभूमीवर जगभरातील अनेक देशांनी आपापली शहरं लॉकडाऊन केली आहेत. भारतातही आणि महाराष्ट्रातही मुंबई, पुणे यांसारखी शहरं लॉकडाऊन (Lockdown) करण्यात आली आहेत. ग्रामीण भागातही लॉकडाऊन स्थिती आहे. त्यामुळे लॉकडाऊन स्थितीत आपण काय करायला हवे? कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी. लॉकडाऊन असताना कोणत्या गोष्टी आपण करायला हव्यात याबाबत अनेकांच्या मनात गोंधळ असतो. म्हणून लॉकडाऊन काळात काय करावे, करु नये? याबाबत काही माहिती.

लॉकडाऊन म्हणजे काय?

लॉक डाऊन याचा अर्थ असा की, विशिष्ट कालावधीसाठी नागरिकांना स्थानबद्ध करणे. याचाच दुसरा अर्थ असा की, नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास मनाई करणे. म्हणजेच असे की, आपण ज्या ठिकाणी आहात त्याच ठिकाणी थांबणे. लॉकडाऊन काळात आपल्याला इमारत, परिसर, राज्य, देश अशा ठिकाणी मर्यादेत ठेवले जाऊ शकते.

लॉकडाऊनमध्ये सर्व काही बंद

लॉकडाउन केलेल्या परिसरात अतिमहत्त्वाच्या सेवा वगळता सर्व गोष्टी बंद ठेवण्यात येतात. ज्यात रेशन, किराना माल, औषधं आणि आरोग्याशी संबंधीत गोष्टी. यात दवाखाना, दूध वैगेरे गोष्टी येतात. वाहतूक आणि दळणवळन पूर्ण बंद असते. (हेही वाचा, Coronavirus: केवळ कोरोना व्हायरस नव्हे, या आधीही भारतात आल्या अनेक साथी, ज्याने घेतले लक्षवधी नागरिकांचे प्राण)

लॉकडाऊन स्थितीत आपण काय करावे?

आपण ज्या ठिकाणी आहात तो प्रदेश जर लॉकडाऊन करण्यात आला तर, आपण घरातच राहावे. तसे करणे बंधनकारक असते. जर अतिशय आवश्यक काम असेल तरच आपण घरातून बाहेर पडा. लॉकडाऊन असताना सर्वसामान्य कामं करण्यास मान्यता नसते. लॉकडाऊन काळात आवश्यक सेवा कक्षात न येणाऱ्या सर्व कंपन्या, कार्यालयं, संस्था बंद ठेवण्यात येतात. त्या सुरु असतील तर त्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येते.

लॉकडाऊन स्थितीत कामाला, ऑफिसला जावे का?

आज घडीला देशात जितक्याही खासगी कंपन्या आहेत त्यांना कर्मचाऱ्यांकडून घरुन काम करुन घ्या असे आदेश देण्यात आले आहेत. केवळ 25 टक्के कर्मचारीच प्रत्यक्ष कार्यालयात बोलवण्याची कंपन्यांना मान्यता आहे. विशेष म्हणजे सरकारने सक्त आदेश दिले आहेत की, कोरोना व्हायरस नियंत्रणात आणत असताना काही कर्मचारी कामावर येऊ शकले नाहीत तर, त्यांचा पगार कापला जाऊ नये.

अन्नधान्य, आवश्यकता भासेल इतका साठा करावा काय?

लॉकडाऊन स्थिती निर्माण झाली म्हणून आपण घाबरुन जाण्याची काहीच स्थिती नाही. तसेच, आवश्यक अन्नधान्यांचा साठा करुन ठेवण्याचीही आवश्यकता नाही. सरकारने नियमीत वापरातल्या गोष्टींची दुकाने बंद केली नाहीत. तसेच, जिवनावश्यक गोष्टींची वाहतूक करणाऱ्या वाहनांवरही बंदी घातली नाही. त्यामुळे उगाच अधिक खर्च करण्याच्या भानगडीत पडू नका.

हेल्थ इमरजन्सी आलीच तर काय कराल?

लॉकडाऊन स्थितीत जर तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील व्यक्तीला अचानक काही वैद्यकीय गरज भासली तर घाबरुन जाण्याचे कारण नाही. राज्य आणि केंद्र सरकारने उपलब्ध करुन दिलेल्या अत्यावश्यक सेवांचा लाभ घ्या. तत्काळ नंबर डायल करा, पोलिसांशी संपर्क करा. सर्व मेडीकल, दवाखाने सुरु असतात.

लॉकडाऊन काळात घाबरुन जाण्याचे मुळीच कारण नाही. सर्व आपल्या स्वत:च्या सुरक्षीततेसाठीच असते. सरकारला, प्रशासनाला अवाहन करावे. जेणेकरुन परिस्थिती नियंत्रणात येण्यास मदत होईल. लक्षात ठेवावे की आपण जितका निष्काळजीपणा दाखवू तितकी परिस्थिती चिघळत असते.