व्यावसायिक एलपीजी सिलिंडर (Commercial LPG Cylinder Prices) ग्राहकांना तेल आणि विपणन कंपन्यांनी दिलासा दिला आहे. या कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी सिलिंडर(Commercial LPG Cylinders Rates) दरात 171.50 रुपयांची कपात केली आहे. दरम्यान, व्यावसायिक एलजपीजी सिलिंडर दरात कपात करण्यात आली असली तही घरगुती सिलिंडर दरात मात्र कोणत्याही प्रकारची कपात करण्यात आली नाही. व्यावसायिक एलपीजी सिलिंडर दरात कपात करण्याचा निर्णय घेतल्यानंतर राजधानी दिल्लीमध्ये सिलिंडरच्या किमती उतरल्या आहेत. साधारण 19 किलो वजनाच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत 1,856.50 रुपये इतकी झाली आहे. पेट्रोलियम आणि तेल विपणन कंपन्यांनी या वर्षी 1 मार्च (2023) रोजी व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किंमती 350.50 रुपये प्रति युनिट आणि घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमती 50 रुपये प्रति युनिटने वाढवल्या होत्या.
दरम्यान, कोलकातामध्ये, 19 किलोच्या व्यावसायिक LPG सिलिंडरची किंमत 1960.50 इतकी झाली आहे. जी आगोदर 2132.00 रुपये इतकी होती. तर महाराष्ट्र्राची राजधानी मुंबई शहरात एलपीजी सिलिंडरची किंमत1808 रुपये असेल. जी आगोदर 1980 वरून इतकी होती. चेन्नईमध्ये, व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत 2192 इतकी होती. ती आता नव्या दरामुळे कमी होऊन 2021 इतकी असेल. दरम्यान, घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात कोणताही बदल नाही.
ट्विट
Commercial LPG cylinder prices slashed by Rs 171.5 per unit
Read @ANI Story | https://t.co/hX2uF4eebP#LPGCylinderPrice #India #Gas #Economy pic.twitter.com/jxywa0wHsU
— ANI Digital (@ani_digital) May 1, 2023
एलपीजी गॅस
एलपीजी (लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस) हे एक लोकप्रिय इंधन आहे. जे स्वयंपाक करणे, वस्तू अथवा पदार्थ गरम करणे आणि वाहनांना उर्जा देणे यासारख्या विविध कामांसाठी वापरले जाते. हे प्रोपेन आणि ब्युटेन वायूंचे मिश्रण आहे जे द्रव अवस्थेत संचयीत केले जाते. ज्यामुळे त्याची वाहतूक करणे आणि ते साठवणे सोपे होते. एलपीजी हे अत्यंत ज्वलनशील आहे आणि ते सामान्यतः स्टील सिलेंडर किंवा टाक्यांमध्ये पुरवले जाते.
घरांमध्ये, एलपीजीचा वापर सामान्यतः स्वयंपाक आणि पदार्थ गरम करण्यासाठी केला जातो. एलपीजीचा वापर वाहनांसाठी इंधन म्हणूनही केला जातो, विशेषत: ज्या भागात पेट्रोल किंवा डिझेल सहज उपलब्ध नसतात किंवा महाग असतात. LPG वाहने पारंपारिक गॅसोलीन किंवा डिझेल वाहनांपेक्षा कमी उत्सर्जन करतात, ज्यामुळे त्यांना एक स्वच्छ पर्याय बनते.
दरम्यान, एलपीजी काळजीपूर्वक हाताळणे आणि अपघात टाळण्यासाठी सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे महत्त्वाचे आहे. एलपीजी गळती धोकादायक असू शकते आणि ती गांभीर्याने घेतली पाहिजे. सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी परवानाधारक व्यावसायिकांद्वारे एलपीजी उपकरणे आणि प्रणाली स्थापित आणि देखरेख ठेवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा राबविण्याचेही सूचवले जाते.