युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ़ इंडिया (UIDAI)भारतातील सर्व रहिवाशांना 12 नंबरचा युनिक आयडेंटिफिकेशन नंबर जारी केला आहे. हे ओळखपत्र मिळविण्यासाठी कोणतीही वयाची किंवा कोणत्याही वंशाची व्यक्ती नावनोंदणी करू शकते.हल्ली नवीन बँक खाते उघडणे,नवीन सिमकार्ड मिळविणे,कंपन्यांना आवश्यक असलेली कोणतीही कागदपत्रे प्रक्रिया,मोबाइल नंबर पडताळणीसह इतर गोष्टींसाठी ओळख पुरावा म्हणून आधारचा कार्डचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.ओळखीचा पुरावा म्हणून नवीन बँक खाते उघडताना लोक सामान्यत: आपले आधार कार्ड देतात.तेव्हा आधार कार्डच्या सुरक्षितते संदर्भात बरेच प्रश्न आणि शंका आपल्या मनात फिरत असतात.
जेव्हा एखादी व्यक्ती आपले आधार कार्ड दाखवते तेव्हा त्याच्या मनात अशी भीती असते की जर त्याचे बँक खाते हॅक झाले किंवा त्याचे वैयक्तिक तपशील लीक झाले तर.पण काळजी करण्याची गरज नाही. यूआयडीएआयने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर सांगितले की, जर कोणाला तुमच्या आधार क्रमांकाची माहिती मिळाली तर कोणीही तुमचे बँक खाते हॅक करू शकत नाही.
यूआयडीएआयने म्हटले आहे की, जसे केवळ आपला एटीएम कार्ड नंबर जाणून घेतल्यास एटीएम मशीनमधून कोणीही पैसे काढू शकत नाही.तसेच आपला आधार नंबर जाणून घेतल्यास कोणीही आपले बँक खाते हॅक करुन पैसे काढू शकत नाही. आपल्याला बॅंकेकडून दिलेला पिन आणि ओटीपी जर तुम्ही कोणाबरोबर शेअर केला नाही तर तुमचे बैंक अकाउंट सुरक्षित आहे.
युआयडीएआयने असे म्हटले आहे की,आधारकार्डमुळे आर्थिक नुकसानीचे एकही प्रकरण समोर आले नाही आणि देशातील जनतेने आधार तपशिलासह बँक अकाउंट हॅक करण्याबाबत अशा कोणत्याही चुकीच्या माहितीला बळी पडू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे . त्यात ते असे ही म्हणाले आहेत की आधार क्रमांक बँकिंग किंवा इतर कोणत्याही सेवेसाठी वापरला जाऊ शकत नाही.डुप्लिकेट आणि बनावट ओळख काढून टाकण्यासाठी आधार हा एक अनन्य आणि भक्कम पुरावा आहे. याचा उपयोग बेस / प्राइमरी अभिज्ञापक म्हणून अनेक सरकारी कल्याणकारी योजना आणि प्रभावी सेवा वितरणासाठीच्या कार्यक्रमांच्या अंमलबजावणीसाठी केला जाऊ शकतो, ज्यामुळे पारदर्शकता आणि सुशासन वाढेल.