GSAT-30 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण, ISRO कडून दूरसंचार क्षेत्रात नवी क्रांती, वाढणार इंटरनेटचा वेग
ISRO Successfully Launched India’s Telecommunication Satellite GSAT-30 | (Photo credit: Arianespace)

GSAT-30 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण झाले आहे. या प्रक्षेपणाच्या रुपात भारतीय अवकाश संशोधन संस्था (Indian Space Research Organisation) म्हणजेच इस्त्रो (ISRO) ने भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. इस्त्रोने GSAT-30 चे येरोपियन हेवी रॉकेट एरियन -5 येथून शुक्रवारी (17 जानेवारी 2019) पहाटे 2.35 मिनिटांनी प्रक्षेपण केले. हे प्रक्षेपण फअरान्सच्या गुएना येथील कोरोउ बेटावरुन करण्यात आले. प्रक्षेपण केल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच GSAT-30 मधून एरियन -5 VA251 चा वरचा भाग यशस्वीरित्या बाजूला झाला. वर्ष 2020 मधील इस्त्रेचे हे पहिलीच कामगिरी आहे.

इस्त्रो ने दिलेल्या माहितीनुसार GSAT-30 एक दूरसंचार उपग्रह आहे. इनसॅट-4 ए सॅटेलाईट च्या ठिकाणी काम करणार आहे. दरम्यान, इनसॅट सॅटेलाईट-4 चा कालावधी आता संपत आला आहे आणि इंटरनेट तंत्रज्ञानात प्रचंड बदल होत आहे. त्यामुळे अतिप्रभावशाली उपग्रहाची आवश्यकता होती. ही आवश्यकता पूर्ण करण्यासाठी इस्त्रोने GSAT-30 लॉन्च केला आहे.

इस्त्रो ट्विट

GSAT-30 उपग्रहाचे वजन सुमारे 3100 किलोग्राम इतके आहे. प्रक्षेपण झाल्यानंतर हा उपग्रह 15 वर्षांपर्यंत कार्यरत असणार आहे. हा उपग्रह जियो-इलिप्टिकल ऑर्बिट काम करेन. यात दोन सोलर पॅनल आणि बॅटरी आहे. ज्यामुळे या उपग्रहाला उर्जा मिळेल. GSAT-30 उपग्रह सॅटेलाईट इनसैट-4ए ची जागा घेईल. इनसॅट -4 ए 2005 मध्ये प्रक्षेपीत करण्यात आला होता. नव्या उपग्रहामुळे इंटरनेटचे स्पीड प्रचंड वाढणार आहे. ज्याचा मोबाईल सेवेवर प्रचंड परिणाम होणार आहे. (हेही वाचा, ISRO कडून RISAT-2BR1 सॅटेलाईट लॉन्च, पहा पहिला फोटो)

एएनआय ट्विट

इस्त्रोने म्हटले आहे की, GSAT-30 अधिक व्यापक स्वरुपात काम करणार आहे. ज्याचा वापर वीसैट नेटवर्क, टेलीव्हीजन अपलिंकिंग, टेलीपोर्ट सेवा, डिजिटल सॅटलाइट वृत्त संग्रहण (डीएसएनजी) , डीटीएच टेलीविजन सेवा यांसोबतच हवामान बदल (Climate change) आदी गोष्टींसाठी काम करेन. इस्त्रो या वर्षी सुमारे 10 उपग्रह अवकाशात सोडण्याच्या योजनेवर काम करत आहे. यात आदित्य-एल1 या उपग्रहाचाही समावेश आहे. हा उपग्रह 2020 च्या मध्यावर प्रक्षेपीत केला जाऊ शकतो. हा उपग्रह सूर्याचा अभ्यास करणारा पहिला उपग्रह असेन.