Representational Image | Economy (Photo Credits: PTI)

ब्रिटेनला (Britain) मागे टाकत भारतीय अर्थव्यवस्था (Indian Economy) ही जगातील पाचवी (Worlds Largest Fifth Economy) सर्वात मोठी अर्थव्यवस्था  झाली आहे. तर ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेची (Britain) भारताच्या (India) मागे घसरण झाली असुन ब्रिटनची अर्थव्यवस्था (Britain Economy) सध्या सहाव्या क्रमांकावर आहे. हा ब्रिटन सरकारसाठी (Britain Government) एक मोठा झटका असुन सध्या ब्रिटनची राजकीय (Britain Politics) स्थिती बघता ब्रिटनसाठी (Britain) ही चिंतेची बाब आहे. त्याविरुध्द भारतीय अर्थव्यवस्था (Indian Economy) यावर्षी 7% पेक्षा जास्त वाढेल असा अंदाज आहे. या तिमाहीत भारतीय समभागांमध्ये जागतिक स्तरावरील पुनरागमनामुळे MSCI इमर्जिंग मार्केट्स इंडेक्समध्ये (Emerging Markets Index) केवळ चीनच्या (China) तुलनेत त्यांचे वजन दुसऱ्या स्थानावर पोहोचले आहे.

 

एका दशकाआधी (Decade) जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था या क्रमवारीत भारताचा (India) पहिल्या दहा अर्थव्यवस्थेत देखील समावेश नव्हता. मात्र आता भारत या यादीत पाचव्या क्रमांकावर (Worlds Largest Fifth Economy) पोहोचला आहे. सध्या भारतीय अर्थव्यवस्था 2027 पर्यंत ब्रिटनच्या (Britain) पुढे असेल असा अंदाज आहे. भारत आता अमेरिका (America), चीन (China), जपान (Japan) आणि जर्मनी (Germany) या देशांनंतर जगातील पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था असणारा देश आहे. (हे ही वाचा:- Starbucks CEO: भारताच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा, भारतीय वंशाचे Laxman Narasimhan स्टारबक्सचे नवे CEO)

 

समायोजित आधारावर आणि संबंधित तिमाहीच्या शेवटच्या दिवशी डॉलर (Dollar) विनिमय दर वापरून, मार्च ते तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्थेचा (Indian Economy) आकार "नाममात्र" रोख अटींमध्ये $854.7 अब्ज होता. त्याच आधारावर UK $816 अब्ज होते. ब्लूमबर्ग टर्मिनलवर (Bloomberg Terminal) IMF डेटाबेस आणि ऐतिहासिक विनिमय दर वापरून गणना केली गेलेली आहे. स्टर्लिंगने रुपयाच्या तुलनेत डॉलरच्या तुलनेत कमी कामगिरी केली आहे, या वर्षी भारतीय चलनाच्या तुलनेत पौंड 8% घसरला आहे.