India Railway: परिक्षा संपल्या आहेत. शाळांना उन्हाळ्याच्या (summer) सुट्ट्या लागल्या आहेत. रेल्वेत प्रवाशांची मोठी गर्दी पहायला मिळत आहे.आरक्षित डब्यात आणि एसी डब्यांमध्ये जेवण आणि पाणी भारतीय रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कोरपोरेशन (आयआरसीटीसी)कडून दिले जाते. परंतु जनरल डब्यांमध्ये अशी काहीच सुविधा नसते. त्यामुळे रेल्वेने जनरल डब्बा (General Coach)तून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा विचार केला आहे. जनरल डब्यात स्वस्तात जेवण आणि पाणी (water) दिले जाणार आहे. 20 रूपयांपासून जेवणाचे दर सुरू होणार आहे. तर 3 रुपयांत पाण्याचा ग्लास दिला जाणार आहे. जेवणाच्या पाकिटात राजमा, छोले, भात, खिचडी, पावभाजी, मसाले डोसा, पूरी-भाजी, असे पदार्थ असणार आहेत. मात्र, दरानुसार हे जेवण दिले जाणार आहे. (हेही वाचा : Indian Railways: भारतीय रेल्वे सेवेबाबत माहिती हवी आहे? बस्स! फक्त डायल करा '139' नंबर, पाहा कमाल)
रेल्वेत परवडणाऱ्या दरात जेवण 20,50, 150 रुपयांत दिले जाणार आहे. सर्वसामान्य डब्यांजवळ रेल्वे स्थानकावर असलेल्या काउंटरवर हे जेवण मिळणार आहे. त्यात 20 रुपयांमध्ये मिळणाऱ्या इकोनॉमी जेवणात सात पुऱ्या ज्याचे वजन175 ग्रॅम, बटाट्याची भाजी 150 ग्रॅम आणि लोणचे देणार आहे. तर 50 रुपयांत कॉम्बो पॅक मिळणाऱ्या जेवणाच्या पाकिटात राजमा, छोले, भात, खिचडी, पावभाजी, मसाले डोसा दिले जाणार आहे. 350 ग्रॅम हे जेवण असणार आहे. परवडणाऱ्या दरात गुणवत्ता आणि स्वच्छतेकडे लक्ष देत हे जेवण दिले जाणार असल्याकडे रेल्वेचा कल आहे
देशातील 100 रेल्वे स्थानकावर 150 इकोनॉमी मील काउंटर सुरु केले आहेत. ज्यात,हैदराबाद, विजयवाडा, रेनिगुंटा, गुंटकल, तिरुपती, राजमुंद्री, विकाराबाद, पकाला, ढोणे, नंद्याल, पूर्णा आणि आपल्या राज्यातील औरंगाबाद रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. लवकरच याची संख्या वाढवण्यात येणार आहे. या ठिकाणी तीन रुपयांत पाणी दिले जात आहे. रेल्वेच्या या सुविधेमुळे सर्वसामान्य प्रवाशांना चांगले जेवण मिळणार आहे. उन्हाळ्यामुळे रेल्वेने विशेष रेल्वे सुरु केल्या आहेत.