प्रवासादरम्यान तुम्ही जर भारतीय रेल्वे सेवेस (Indian Railway Service) प्राधन्य देत असाल आणि त्यासंदर्भात आपल्याला काहीही मदत हवी असेल तर काळजी करु नका. तुम्ही फक्त एक टोल फ्री (Indian Railway Service Toll Free Number) क्रमांक डायल करा. तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे एका झटक्यात तुम्हाला उपलब्ध होतील. होय, भारतीय रेल्वेने आपल्या ग्राहकांसाठी हेल्पलाइन नंबर 139 उपलब्ध करुन दिला आहे. ज्याद्वारे आपण आपल्या सर्व तक्रारींचे निरसन करुन घेऊ शकता. हा हेल्पलाईन क्रमांक इंटरॅक्टीव्ह वॉईस रिस्पॉन्स सिस्टम (IVRS) वर आधारित आहे. याच्या माध्यमातून प्रवासी सुरक्षा, वैद्यकीय तातडीची मदत, चौकशी, केटरिंग आणि सामान्य तक्रार, रेल्वे अपघात आदींशी संबंधीत सर्व माहिती मिळवू शकतात.
रेल्वे मंत्रालयाे ट्विट केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे एकाच ठिकाणी. कोणताही प्रश्न अथवा सहकार्याची गरज. काळजी करु नका. आपण केवळ एक कॉल करा आणि रेल्वे मदत हेल्पलाईन क्रमांक 139 सोबत जोडले जा'.
हेल्पलाईन क्रमांक 139 द्वारे आपण पुढील प्रकारे माहिती मिळवू शकता. रेल्वे सुरक्षेसंबंधी माहिती- 1 दाबा, वैद्यकीय तातडीची मदत-2 दाबा, रेल्वे अपघाताबाबत माहिती, सूचना- 3 दाबा, रेल्वे सेवेबाबत तक्रार- 4 दाबा, सामान्य तक्रार- 5 दाबा, दक्षतेसंबंधी माहिती-6 दाबा, वस्तू भाडे, पार्सल संबंधी माहिती- 7 दाबा, तक्ररीबाबत माहिती- 8 दाबा, स्टेशन, सावधानता, भ्रष्टाचार यांबाबत माहिती-9 दाबा, कॉल सेंटर अधिकाऱ्याशी बोलण्यासाठी * दाबा, याशिवा इतर चौकशी जसे की, PNR, भाडे, तिकीट बुकींग आदींशी संबंधित माहिती साठी 0 दाबा.
दरम्यान, 139 नंबर IVRS- इंटरएक्टिव वॉयस रिस्पॉन्स प्रणालीवर आधारीत आहे. सर्व मोबाईल धारक 139 वर कॉल करुन माहिती मिळवू शकतात. विविध माहिती SMS पाठवूनही मागवू शकतात.