रशिया आणि युक्रेनमध्ये (Russia Ukraine War) सुरू असलेल्या संघर्षाचा आज 10 वा दिवस आहे. रशियाकडून युक्रेनवर सातत्याने हल्ले होत आहेत, तर युक्रेनही त्याला चोख प्रत्युत्तर देत आहे. दोन्ही देशांमध्ये सुरू असलेले युद्ध कधी संपेल, याची शाश्वती सध्या तरी नाही. दरम्यान, युक्रेनमधील सुमी येथे अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांबाबत (Indian Student) भारत सरकारने (Indian Govt) चिंता व्यक्त केली आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची (Arindam Bagchi) यांनी म्हटले आहे की, युक्रेनमधील (Ukrain) सुमी (Sumy) येथील भारतीय विद्यार्थ्यांबाबत आम्हाला खूप काळजी आहे. आमच्या विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित कॉरिडॉर तयार करण्यासाठी रशिया आणि युक्रेनच्या सरकारांवर तात्काळ युद्धबंदीसाठी अनेक माध्यमांद्वारे जोरदार दबाव आणला जात आहे.
परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की, "आम्ही युक्रेनमधील सर्व भारतीय विद्यार्थ्यांना सतर्क आणि सुरक्षित राहण्यास सांगितले आहे." सर्व विद्यार्थ्यांनी सुरक्षित ठिकाणी राहावे आणि अनावश्यक धोका पत्करू नये. परराष्ट्र मंत्रालय आणि आमचे दूतावास विद्यार्थ्यांच्या सतत संपर्कात आहेत. सुमी हे संघर्ष क्षेत्रांपैकी एक आहे जेथे रशियन आणि युक्रेनियन सैन्यांमध्ये भीषण लढाई होत आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी शुक्रवारी सांगितले की, सुमीमध्ये 700 भारतीय अडकल्याची माहिती आहे.
Tweet
Have advised our students to take safety precautions, stay inside shelters and avoid unnecessary risks. Ministry and our Embassies are in regular touch with the students: Arindam Bagchi, MEA Spokesperson
(file pic) pic.twitter.com/Wr31Xw04AZ
— ANI (@ANI) March 5, 2022
विशेष म्हणजे 24 फेब्रुवारीपासून रशियाच्या लष्करी कारवाईला सुरुवात झाल्यापासून युक्रेनची हवाई हद्द बंद करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत भारत युक्रेनच्या शेजारील देश - रोमानिया, हंगेरी, स्लोव्हाकिया आणि पोलंडमधून आपल्या नागरिकांना विशेष विमानांद्वारे बाहेर काढत आहे. Air India, Air India Express, Indigo, GoFirst, SpiceJet आणि Air Asia India द्वारे चालवल्या जाणार्या इव्हॅक्युएशन फ्लाइट व्यतिरिक्त, भारतीय हवाई दल युक्रेनमधून अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी सरकारला मदत करत आहे. (हे ही वाचा युक्रेन मधून भारतात आलेल्या वैद्यकीय पदवीधारकांना देशात Internship पूर्ण करण्याची मुभा)
12 लाख लोकांनी युक्रेन सोडले
रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे लाखो लोकांना शेजारील देशांमध्ये आश्रय घ्यावा लागला आहे. युद्धामुळे आतापर्यंत 12 लाख लोकांनी देश सोडला आहे. देशाच्या एकूण लोकसंख्येच्या हे प्रमाण दोन टक्के आहे. युक्रेन सोडणाऱ्या या लोकांमध्ये बहुतेक मुले आणि महिलांचा समावेश आहे, कारण देशातील 18-60 वयोगटातील पुरुषांना देश सोडण्यास बंदी घालण्यात आली आहे. युक्रेनियन लोकांनी देश सोडल्यास युरोपमध्ये निर्वासितांचे संकट उद्भवू शकते, असा इशारा संयुक्त राष्ट्राने दिला आहे.