M.K Stalin यांनी मानले Raj Thackeray यांचे आभार; भाषेची समानता, प्रादेशिक ओळख आणि राजकीय स्वातंत्र्याची दिली ग्वाही
M. K. Stalin, Raj Thackeray (Photo Credit: FB)

देशातील पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, असम आणि पुडुचेरी विधानसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले आहेत. महत्वाचे म्हणजे, तामिळनाडूत (Tamil Nadu Assembly Election) गेल्या 10 वर्ष सत्तेपासून दूर असलेल्या डिएमके (DMK) पक्षाने झेंडा फडकवला आहे. या घवघवीश यशानंतर डिएमकेचे अध्यक्ष एम के स्टॅलिन (MK Stalin) यांच्यावर अनेक स्तरातून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. याचपार्श्वभूमीवर महाराष्ट्र निवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनीही ट्विटरच्या माध्यमातून स्टॅलिन यांचे अभिनंदन केले होते. तसेच भाषेची समानता, प्रादेशिक ओळख आणि राजकीय स्वातंत्र्याचा लढा पुढे कायम ठेवाल, अशी इच्छा व्यक्त केली आहे. यावर स्टॅलिन यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राज ठाकरे यांनी केलेल्या ट्विटवर रिप्लाय देत स्टॅलिन म्हणाले की, हो आपण म्हटल्याप्रमाणे भाषिक, प्रांतिक अस्मिता आणि राज्यांची स्वायत्तता हाच माझ्या पुढील राजकारणाचा पाया असेल, अशी ग्वाही स्टॅलिन यांनी राज ठाकरे यांना दिली आहे. हे देखील वाचा- Assembly Election Results 2021: 'मोदी जी आणि अमित शाहजी यांचाही पराभव होऊ शकतो, ममता बॅनर्जी यांनी दिला स्पष्ट संदेश'- शिवसेने नेते संजय राऊत यांची प्रतिक्रिया

ट्वीट-

तामिळनाडूच्या गेल्या विधानसभेत जयललिता यांच्या नेतृत्वात अण्णाद्रमुकने 136 जागेवर विजय मिळवला होता. तर, करूणानिधी यांच्या नेतृत्वात द्रमुकच्या खात्यात 98 जागा पडल्या होत्या. ज्यामुळे जयललिता सलग दुसऱ्यांदा तामिळनाडूच्या मुख्यमंत्री बनल्या. परंतु, 5 डिसेंबर 2016 मध्ये त्यांचे निधन झाले. ज्यामुळे पन्नीरसेल्वम यांच्यावर मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. परंतु, त्यांना जास्त काळ मुख्यमंत्री राहता आले नाही. त्यानंतर पलानीस्वामी हे मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले होते.