चेन्नई शहर पोलिसांनी (Chennai Police) एका 40 वर्षीय व्यक्तीला अटक (Arrest) केली आहे. ज्यात पत्नीचे विवाहबाह्य संबंध (Extramarital affair) असल्याचा संशय घेऊन तिला जाळून टाकले आहे. पी पूवरजा असे आरोपीचे नाव आहे, जो चेन्नईतील वालासारवक्कम (Valasaravakkam) येथे राहणारा रोजंदारी कामगार आहे. पीडित राधा गंभीर भाजली असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सोमवारी संध्याकाळी 6.30 च्या सुमारास पूवराजा घरात आला आणि राधाशी भांडण केले, असे पोलिसांनी सांगितले. त्याने तिच्या अंगावर रॉकेल ओतून तिला पेटवून दिले, अशी माहिती पोलिसांनी दिली. हेही वाचा Crime: निरोप समारंभासाठी मोफत प्रवेश पास देण्यास नकार दिल्याने शालेय विद्यार्थ्याचे अपहरण करून बेदम मारहाण, 5 जणांवर गुन्हा दाखल
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राधाच्या किंकाळ्या ऐकून त्यांचे शेजारी त्यांच्या घरी पोहोचले, त्यांनी आग विझवली आणि तिला तातडीने सरकारी किलपॉक मेडिकल कॉलेजमध्ये नेले. राधाच्या तक्रारीच्या आधारे, आर-9 वालस्रावक्कम पोलिसांनी पूवराजाला हत्येच्या प्रयत्नाच्या आरोपाखाली अटक केली आणि नंतर त्याला न्यायालयाने कोठडी सुनावली.