Cyclone Representative (Photo Credits: ANI)

बंगालच्या उपसागरात ‘आसानी’ चक्रीवादळाचा (Asani Cyclone) व्यापक परिणाम आजपासून दिसून येणार आहे. ते आंध्र-ओडिशा (Andhra Pradesh & Odisha) किनार्‍यावरून आज म्हणजेच 10 मे रोजी पश्चिम-मध्य आणि वायव्य-पश्चिम बंगालच्या उपसागरात (North-West Bengal) पोहोचण्याची शक्यता आहे. तो ईशान्येकडे वळेल, असा अंदाज हवामानतज्ज्ञांनी (IMD) व्यक्त केला आहे. त्यामुळे पश्चिम बंगाल, ओडिशा आणि आंध्र प्रदेश या तीन राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. अनेक जिल्ह्यांत पावसाला सुरुवात झाली आहे. हवामानशास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, चक्रीवादळ गेल्या 6 तासांमध्ये 12 किमी प्रतितास वेगाने पश्चिम-वायव्य दिशेने सरकत आहे आणि पुरीपासून सुमारे 590 नैऋत्य आणि गोपालपूर, ओडिशाच्या दक्षिण-पश्चिमेस सुमारे 510 किमी अंतरावर आहे.

हवामान खात्याने म्हटले आहे की पश्चिम मध्य आणि लगतच्या दक्षिण बंगालच्या उपसागरात समुद्राची स्थिती खूप तीव्र होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत मच्छिमारांना 13 मे पर्यंत किनाऱ्यावर न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

Tweet

चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर ओडिशा सरकारची योजना

ओडिशा सरकारने चार किनारी जिल्ह्यांतील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याची योजना आखली आहे. ओडिशाच्या सर्व बंदरांवर चेतावणी दर्शवणारी चिन्हे लावण्यात आली आहेत. हे चक्रीवादळ ओडिशा किंवा आंध्र प्रदेशात धडकणार नाही, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. ते पूर्व किनाऱ्याला समांतर धावेल आणि पाऊस पडेल. (हे देखील वाचा: Fake News Alert: भारतात यंदा मान्सून लवकर दाखल होणार असल्याच्या वायरल बातम्या खोट्या; पहा IMD काय सांगतय?)

यूपी-बिहारमध्येही दिसून येईल परिणाम

आसनी चक्रीवादळाचा प्रभाव बिहार आणि उत्तर प्रदेशच्या पूर्वेकडील जिल्ह्यांवरही दिसून येईल. येथे 11 आणि 12 मे रोजी पूर्व उत्तर प्रदेशातही तेजासह जोरदार वादळी वाऱ्यांचा इशारा देण्यात आला आहे. पूर्व उत्तर प्रदेशात 14 मेपर्यंत पाऊस पडू शकतो. हवामान खात्यानुसार, गोरखपूर, महाराजगंज, कुशीनगर, बस्ती, आझमगड, बलरामपूर, श्रावस्ती, बलियासह लगतच्या पूर्वेकडील जिल्ह्यांमध्ये १४ मेपर्यंत हलक्या पावसाचा अंदाज आहे.