Fake News Alert: भारतात यंदा मान्सून लवकर दाखल होणार असल्याच्या वायरल बातम्या खोट्या; पहा IMD काय सांगतय?
Rain Update | (Image Used For Representational purpose Only | (Photo Credits: Pixabay.com)

महाराष्ट्रासह भारतामध्ये सध्या उष्णतेच्या लाटेमुळे सामान्यांची लाहीलाही होत आहे. तापमानाचा चढता आलेख नवनवे विक्रम रचत आहे. अशामध्ये काल यंदा भारतात मान्सून 2022 (Monsoon 2022) चं आगमन 10 दिवस आधी होण्याची शक्यता असल्याचं वृत्त देण्यात आले आहे. पण देशात मान्सून दाखल होण्यासंबधीच्या काही दिशाभूल करण्या-या बातम्या अनेक जण पसरवत आहेत. कृपया त्याकडे दुर्लक्ष करावे. असे ट्वीट हवामान खात्याच्या के एस होसाळीकर ( K S Hosalikar) यांनी करत नागरिकांना खोट्या बातम्यांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे.

के एस होसाळीकर, आयएमडी पुण्याचे प्रमुख आहेत. त्यांनी ट्वीट करत दिलेल्या माहितीनुसार, यंदाच्या मान्सून बाबत आयएमडी म्हणजेच भारतीय हवामान अंदाज विभागाकडून कोणतीही माहिती देण्यात आली नाही. सध्या वायरल होत असलेली वृत्त ही दिशाभूल करणारी आहेत अशा खोट्या बातम्यांमुळे अनेकांचे नुकसान होईल. असेही त्यांनी म्हटलं आहे. हे देखील नक्की वाचा: Monsoon Forecast 2022 : जून महिन्यात मान्सूनची होणार दमदार एंट्री; 98% पावसाचा स्कायमेट चा अंदाज .

के एस होसाळीकर ट्वीट

दरम्यान दक्षिण अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. परिणामी दक्षिण अंदमान समुद्र आणि दक्षिण पूर्व बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. हा कमी दाबाचा पट्टा 7 मे ला संध्याकाळी दक्षिण पूर्व बंगालच्या खाडीत आणि 8 मे ला संध्याकाळी हा कमी दाबाचा पट्टा पूर्व मध्य बंगालच्या खाडीमध्ये चक्रीवादळाचे स्वरुप धारण करण्याची शक्यता असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.