Sudden Death Caught on Camera in UP: स्वीमिंग पूलमधून बाहेर आला अन् मृत्यूला कवटाळले, मेरठ येथील घटना सीसीटीव्हीत कैद
Sudden Death Caught on Camera in UP PC TW

Sudden Death Caught on Camera in UP: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh)मेरठ येथे अल्पवयीन मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. स्विंमींग पूलमध्ये पोहण्यासाठी गेला होता. त्यानंतर स्वीमिंग पूलमधून (Swimming Pool) बाहेर आला तेवढ्यात तो जमीनीवर कोसळला. उपस्थित लोकांच्या मदतीने त्याला रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेनंतर कुटुंबांनी शोक व्यक्त केला आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली.  (हेही वाचा-  भरदिवसा पत्नीचे केले अपहरण, पुण्यातील वाकड येथील घटना

 

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना शुक्रवारी 21 जून रोजी घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मेरठ मधील या घटनेनंतर शहरात खळबळ उडाली आहे. मुलाचा मृत्यू कश्याने झाला या शोध सुरु आहे. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, मुलगा स्वीमिंग पूलमध्ये पोहायला गेला. पूलमधून बाहेर पडला आणि पुढे जात असताना तो अचानक खाली कोसळला. त्याला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले पंरतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, मुलगा स्वीमिंग पूलमध्ये येण्याआधी तो क्रिकेट खेळत होता. समीर असं मृत मुलाचे नाव आहे. तो मेरठ येथील सिवालखास येथील रहिवासी आहे. त्याचा मृत्यू ह्रदयविकाराच्या झटक्याने झाला असे सांगण्यात येत आहे. पोलिस या प्रकरणी पुढील कारवाई करत आहे.