जागतिक दर स्थिर राहिले तरीही शुक्रवारी भारतात सोन्याचे (Gold) भावात थोडा बदल झाला आहे. MCX सोन्याच्या किमती सलग दुसऱ्या आठवड्याच्या घसरणीसाठी तयार आहेत. आज सोने आणि चांदीच्या (Silver) किंमतीत किंचित वाढ झाली आहे. एमसीएक्स (MCX) वर सोने आज 46,441 रुपये आहे. तर चांदीची किंमत 62046 रुपये प्रति किलो आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात, सोने 1756 डॉलर प्रति औंस झाले आहे. तर चांदी 23.44 डॉलर प्रति औंसवर स्थिर राहिली. कालही सोने आणि चांदीमध्ये वाढ झालेली दिसून आली. परंतु सोने अजूनही त्याच्या विक्रमी पातळीपेक्षा 56,200 रुपये प्रति 10 ग्रॅमपेक्षा 10,000 रुपयांनी स्वस्त आहे. एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक तपन पटेल म्हणाले, अमेरिकन ट्रेझरी कमाईमध्ये घसरण आणि डॉलर कमकुवत झाल्यामुळे सोन्याच्या किमतीत सुधारणा झाली आहे.
तर आज एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक आणि टीसीएस चे शेअर्स सेन्सेक्सच्या बळावर सुरुवातीच्या व्यापारात 250 पेक्षा जास्त अंकांनी वाढले. तसेच 55,000 चा आकडा पार केला आहे. बीएसईचा 30-शेअरचा सेन्सेक्स 258.4 अंकांच्या वाढीसह 55,102.42 च्या सर्वकालीन उच्चांकावर व्यवहार करत होता. दुसरीकडे नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी सुरुवातीच्या व्यापारात 69.80 अंक किंवा 0.43 टक्क्यांनी 16,434.20 अंकांवर होता.
सेन्सेक्स कंपन्यांमध्ये एल अँड टी, एचडीएफसी बँक, आयटीसी आणि अॅक्सिस बँक हेही लाभले आहेत. यांचे शेअर्स थोड्या प्रमाणात वाढल्याचे दिसून आले आहे. तर दुसरीकडे डॉ रेड्डीज, सन फार्मा, पॉवर ग्रिड आणि टाटा स्टीलचे शेअर्स तोट्यात व्यापार करत होते. दरम्यान आंतरराष्ट्रीय तेलाचा बेंचमार्क ब्रेंट क्रूड 0.59 टक्क्यांनी घसरून 70.89 डॉलर प्रति बॅरलवर आला.