NSE Co-Location Case: सीबीआयने सोमवारी नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या (NSE) माजी सीईओ चित्रा रामकृष्ण (Chitra Ramkrishna) आणि माजी सीईओ आनंद सुब्रमण्यम (Anand Subramaniam) यांना दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टात हजर केले. येथे न्यायालयाने माजी सीईओ चित्रा रामकृष्ण यांना 7 दिवसांची तर आनंद सुब्रमण्यम यांना 2 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे. चार दिवसांच्या चौकशीनंतर रविवारी रात्री उशिरा चित्रा यांना सीबीआयने अटक केली. तर आनंद सुब्रमण्यम आधीचं सीबीआय कोठडीत होते.
सीबीआयने न्यायालयात सांगितले की, 6 मार्च रोजी चित्रा रामकृष्ण आणि आनंद सुब्रमण्यम यांची भेट झाली होती. परंतु, चित्रा यांनी आनंद सुब्रमण्यम यांना ओळखण्यास नकार दिला. चित्रा या सीबीआयच्या प्रश्नांना टाळाटाळ करणारी उत्तरे देत होत्या. सीबीआयचे म्हणणे आहे की चित्रा आणि आनंद यांच्यातील 2500 ईमेल ट्रेस करण्यात आले आहेत, ज्याचा तपास करणे आवश्यक आहे. (वाचा - धक्कादायक! कौटुंबिक वादात ढवळाढवळ केल्याने पत्नीसह 2 मेहूण्यांना घातल्या गोळ्या; तिघांचा मृत्यू)
सीबीआयने न्यायालयात सांगितले की, सेबी आणि एनएसईच्या त्या अधिकाऱ्यांचाही शोध घ्यावा लागेल, जे चित्रा व आनंद यांच्याशी संबंधित होते. मात्र, चित्रा रामकृष्ण यांच्या वकिलाने सांगितले की, ते स्वत: सीबीआयसमोर पोहोचून तपासात सहभागी झाले असून सीबीआयनेही सुमारे 4 दिवस चौकशी केली आहे. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने चित्रा यांना 14 मार्चपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली.
चित्रा यांच्यावर गंभीर आरोप -
चित्रा रामकृष्णा एप्रिल 2013 ते डिसेंबर 2016 पर्यंत NSE च्या MD आणि CEO होत्या. विशेष म्हणजे, हिमालयन योगी यांच्या सांगण्यावरून चित्रा यांच्यावर राष्ट्रीय शेअर बाजार चालवल्याचा आणि संवेदनशील माहिती शेअर केल्याचा आरोप आहे. या संदर्भात, सीबीआयने नुकतेच एनएसईचे माजी ग्रुप ऑपरेटिंग ऑफिसर (जीओओ) आनंद सुब्रमण्यम यांना त्यांच्या चेन्नई येथील निवासस्थानातून अटक केली होती आणि ते हिमालयन योगी असल्याचा दावा केला होता. आनंद सुब्रमण्यम यांच्यावर एनएसईच्या कामकाजात हस्तक्षेप केल्याचा आरोप आहे. यासोबतच तो एनएसईच्या माजी सीईओ चित्रा रामकृष्ण यांना सल्ला द्यायचा आणि त्या त्यांच्या इशाऱ्यावर काम करायच्या.
को-लोकेशन स्कॅम काय आहे?
शेअर खरेदी-विक्रीचे केंद्र असलेल्या देशातील प्रमुख नॅशनल स्टॉक एक्स्चेंजमधील काही दलालांना अशी सुविधा देण्यात आली होती, जेणेकरून त्यांना शेअर्सच्या किमतींची माहिती इतरांपेक्षा लवकर मिळू शकेल. याचा फायदा घेऊन ते प्रचंड नफा कमावत होते. हे बहुधा NSE च्या डिम्युच्युअलायझेशन आणि पारदर्शकतेवर आधारित फ्रेमवर्कचे उल्लंघन करत होते. रिग्ड इनसाइडर्सच्या मदतीने सर्व्हरचे को-लोकेशन करून त्यांना थेट प्रवेश देण्यात आला. सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाला या संदर्भात माहिती प्राप्त झाली. एनएसई अधिकाऱ्यांच्या मदतीने काही दलाल आधीच माहितीचा फायदा घेत असल्याचा आरोप करण्यात आला. एनएससीच्या खरेदी-विक्रीतील तेजीचा विचार करता, पाच वर्षांत घोटाळ्याची रक्कम 50,000 कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे.