Fire Breaks Out At Bengal's Ghutiari Sharif Railway Station: पश्चिम बंगाल (West Bengal) च्या दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील घुटियारी शरीफ रेल्वे स्थानकावर (Ghutiari Sharif Railway Station) रविवारी भीषण आग (Fire) लागली. अग्निशमन दलाच्या सूत्रांनी सांगितले की, दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील रेल्वे स्टेशनवरील एका दुकानात आग लागली. या आगीत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. सकाळी 10.30 वाजता प्लॅटफॉर्म क्रमांक एकवरील एका दुकानात प्रथम आग लागली आणि ती प्लॅटफॉर्मवरील इतर स्टॉलमध्ये पसरली.
आगीच्या घटनेनंतर प्लॅटफॉर्मवर गाड्यांची वाट पाहत असलेल्या प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. रेल्वे पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणण्यात यश मिळवले. परंतु, प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सियालदह-दक्षिण विभागातील रेल्वे सेवा काही काळ विस्कळीत झाली. (हेही वाचा -Fire On Overbridge At Prayagraj Station: प्रयागराज स्थानकावरील ओव्हरब्रिजला आग; प्रवाशांमध्ये घबराट, पहा व्हिडिओ)
घुटियारी शरीफ रेल्वे स्टेशनला आग, पहा व्हिडिओ -
VIDEO | A major fire broke out at the Ghutiari Sharif railway station in Sealdah South line in South 24 Parganas, West Bengal. The fire broke out at Platform Number 1. Several shops were burnt down. The railway police and locals are trying to douse the fire. More details are… pic.twitter.com/OikKh52iyC
— Press Trust of India (@PTI_News) September 8, 2024
दिल्लीतील गारमेंट फॅक्टरीला भीषण आग -
आज पश्चिम दिल्लीतील बकावाला भागात एका कपड्याच्या कारखान्याला भीषण आग लागली होती. अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नानंतर ही आग विझवण्यात आली. तथापी, या दुर्घटनेत कारखान्यातील कपड्यांचे मोठे नुकसान झाले आहे.