Fire On Overbridge At Prayagraj Station (फोटो सौजन्य - X/@NewsBpi)

Fire On Overbridge At Prayagraj Station: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) प्रयागराज जंक्शन रेल्वे स्थानकावर (Prayagraj Junction Railway Station) मोठा अपघात टळला. येथे फलाट क्रमांक एकवर बांधलेल्या ओव्हर ब्रिजला अचानक आग (Fire On Overbridge) लागली. आगीमुळे रेल्वे स्थानकावर एकच गोंधळ उडाला. या घटनेमुळे स्थानकावर उपस्थित प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. मात्र, आगीवर वेळीच नियंत्रण मिळवण्यात आले. या घटनेत कोणतीही जीवित वा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रयागराज जंक्शन रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म एकवर प्रवासी नेहमीप्रमाणेच ये-जा करत होते. यावेळी रात्री 11.05 च्या सुमारास फलाट एक वर बांधलेल्या फूट ओव्हर ब्रिजला आग लागली. सर्वप्रथम विजेच्या पॅनलला आग लागली. आगीच्या ज्वाळा दुरून दिसत होत्या. आग पाहिल्यानंतर आरपीएफच्या जवानांनी फूट ओव्हर ब्रिजवरील लोकांची ये-जा थांबवली. (हेही वाचा -Mumbai Fire: परेल येथील टाइम्स टॉवर इमारतीला लागली आग; कोणतीही जीवितहानी नाही)

दरम्यान, आग लागली तेव्हा ओव्हर ब्रिजवर फारसे प्रवासी नव्हते. सुमारे 45 मिनिटांनंतर आगीवर नियंत्रण मिळवता आले. आगीमुळे कोणतीही जीवित वा वित्तहानी झालेली नाही. अचानक लागलेल्या आगीमुळे घटनास्थळी उपस्थित प्रवासी घाबरले आणि रेल्वे स्थानकावर एकच गोंधळ उडाला. मात्र, आगीवर नियंत्रण मिळविल्यानंतर सर्व काही सामान्य झाले. (हेही वाचा - Gwalior Fire Breaks: ग्वाल्हेरमध्ये तीन मजली घराला आग, वडील आणि दोन मुलींचा मृत्यू)

प्रयागराज स्थानकावरील ओव्हरब्रिजला आग, पहा व्हिडिओ - 

आगीचा संदेश मिळाल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून तेथील रेल्वे वाहतूकही सुमारे 15 मिनिटे थांबवण्यात आली होती. प्राथमिक तपासात सिग्नलिंग केबलमध्ये शॉर्टसर्किट झाल्याचे आढळून आले. त्यामुळे ही आग लागली असावी, असा अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.