UGC Calendar 2020–21: कॉलेज आणि विद्यापीठांच्या स्थगित परीक्षा, आगामी शैक्षणिक वर्ष प्रवेश प्रक्रिया बद्दल नवी नियमावली जाहीर; जाणून घ्या 'या' महत्त्वाच्या तारखा

पहिल्या वर्षासाठी ऑगस्ट 2020 मध्ये प्रवेशप्रक्रिया सुरू होणार आहे. तर शैक्षणिक वर्षाची सुरूवात सप्टेंबर 2020 मध्ये सुरू होईल. पहा यंदाच्या UGC calendar 2020-21 साठी कमिशनकडून देण्यात आलेल्या महत्त्वाच्या गोष्टी, नियमावली आणि महत्त्वाच्या तारखा.

UGC Calendar 2020–21: कॉलेज आणि विद्यापीठांच्या स्थगित परीक्षा, आगामी शैक्षणिक वर्ष प्रवेश प्रक्रिया बद्दल नवी नियमावली जाहीर; जाणून घ्या 'या' महत्त्वाच्या तारखा
Representational Image (Photo Credits: unsplash.com)

The University Grants Commission ने आता 2020-21 या शैक्षणिक वर्षासाठी वेळापत्रक जाहीर केलं आहे. कमिशनने परीक्षा आणि नव्या शैक्षणिक वर्षासाठी गाईडलाईंस जाहीर केल्या आहेत.दरम्यान पॅनलने सुचवलेल्या काही सुचनांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. पहिल्या वर्षासाठी ऑगस्ट 2020 मध्ये प्रवेशप्रक्रिया सुरू होणार आहे. तर शैक्षणिक वर्षाची सुरूवात सप्टेंबर 2020 मध्ये सुरू होईल. पहा यंदाच्या UGC calendar 2020-21 साठी कमिशनकडून देण्यात आलेल्या महत्त्वाच्या गोष्टी, नियमावली आणि महत्त्वाच्या तारखा

सध्या भारतामध्ये फैलावत असलेल्या कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर UGC ने विशेष सूचना जारी केल्या आहेत. दरम्यान सध्या देशभरात लॉकडाऊन सुरू आहे. त्याचा परिणाम अ‍ॅडमिशन आणि परीक्षांवर झाला आहे. कोरोना व्हायरस लॉकडाऊन दरम्यान JNU, UGC NET, PhD, NEET, TTE च्या प्रवेश परीक्षा लांबणीवर.

UGC Calendar 2020-21साठी महत्त्वाची नियमावली

  • सध्या स्थगित करण्यात आलेल्या परीक्षा जुलै आणि ऑगस्ट 2020 मध्ये घेतल्या जातील.
  • विद्यापीठांना परीक्षा आणि विद्यार्थांचे गुण मूल्यांकन करण्यासाठी innovative modesचा विचार करण्याचा सल्ला दिला आहे. परीक्षांचा कालावधी कमी ठेवला जावा. यामध्ये 3-2 तास हा कलावधी करा. हे नियम तात्पुरते आहेत.
  • Virtual classroom, video-conferencing अशा तंत्रज्ञानाचा वापर करण्यात यावा.त्यासाठी शिक्षकांना योग्य गाईडलाईंस आणि मार्गदर्शन करावं.
  • जुन्या विद्यार्थ्यांसाठी नवं शैक्षणिक वर्ष 1 ऑगस्ट 2020 पासून सुरू होईल.
  • नव्या विद्यार्थ्यांची प्रवेशप्रक्रिया 1 ते 31 ऑगस्ट दरम्यान घेतल्या जातील. तर वर्ग 1 सप्टेंबर 2020 पासून सुरू होतील.
  • सध्या कोणत्याच गोष्टींचं ठाम उत्तर देता येऊ शकत नाही. त्यामुळे गरजेनुसार त्यामध्ये बदल करण्याची मुभा देखील देण्याचा सल्ला देण्यात आला आहे. भविष्यात विद्यार्थ्यांचे हित पाहता काही बदल केले जाऊ शकतात.
  • 31 मे 2020 पर्यंत जुन्या वेळापत्रकानुसार ऑनलाईन आणि डिस्टनंस लर्निग द्वारा वर्ग सुरू राहतील.
  • जुलै महिन्यात वार्षिक परीक्षा होतील तर त्याच महिन्यात निकाल लावले जाऊ शकतात. तर intermediate साठी निकाल 14 ऑगस्ट नंतर जाहीर केले जातील.

UGC ची नवी नियमावली ही दोन कमिटींद्वारा देण्यात आलेल्या सूचनांप्रमाणे असेल. यामध्ये एका समितीद्वारा परीक्षा आणि नवं शैक्षणिक कॅलेंडर यांबाबत सूचना देणारं होतं. तर दुसरं हे ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून शैक्षणिक वर्षाला कशी चालना मिळू शकतं यासाठी होतं.

(The above story first appeared on LatestLY on Apr 30, 2020 05:09 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).