कोरोना व्हायरस लॉकडाऊन दरम्यान JNU, UGC NET, PhD, NEET, TTE च्या प्रवेश परीक्षा लांबणीवर
Exam Dates| Image used for representational purpose | (Photo Credits: Unsplash.com)

भारतामध्ये वाढत्या कोरोनाग्रस्तांची संख्या पाहता मानव संसाधन विकास मंत्रालयाने आता JNU, UGC, NET आणि IGNOU PhD सारख्या महत्त्वाच्या प्रवेश परीक्षा आता पुढे ढकलल्या आहेत. केंद्रीय मंत्री रमेश पोखरियाल यांनी दिलेल्या माहितीनुसार National Testing Agency च्या सल्ल्यानुसार, आगामी अनेक परीक्षांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारिख देखील आता पुढे ढकलण्यात आली आहे. यामध्ये जेएनयू ची UGC NET, IGNOU PhD, ICAR Exam, NCHM-G आणि मॅनेजमेंट कोर्स यांचा समावेश आहे. सध्या या परीक्षांची तारीख महिन्याभरासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. Maharashtra CET 2020 Application Dates कोरोना व्हायरस लॉकडाऊनमुळे लांबणीवर; cetcell.mahacet.org वर पहा संपूर्ण नवं वेळापत्रक

दरम्यान Ministry of Human Resource Developmentकडून CBSE, NIOS आणि NTA ला देखील नव्याने परीक्षांचं वेळापत्रक बनवण्यास सांगितले आहे. त्यासोबतच NCERT आणि अन्य स्वायत्त शिक्षणसंस्थांना पर्यायी शैक्षणिक वेळापत्रक बनवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे विद्यार्थ्यांवर परीक्षांचं दडपण राहणार नाही आणि त्यांना आगामी परिक्षांना सामोरं जाण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल.

भारतामधील कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता यंदाची वैद्यकीय क्षेत्रातील NEET परीक्षा देखील पुढे ढकलण्यात आली आहे. यापरीक्षांचे अ‍ॅडमिट कार्ड देखील अद्याप देण्यात आलेली नाही. मंत्रालयाकडून ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. देशात सध्या लॉकडाऊन असल्याने अनेक परीक्षांचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे. JEE Main परीक्षादेखील पुढे ढकलण्यात आली आहे.

इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी (IGNOU) नेदेखील लेट फी माफ करत विद्यार्थींना अर्ज दाखल करण्यासाठी 30 एप्रिल पर्यंत वेळ वाढवून दिला आहे. विद्यार्थ्यांना आता June TEE examination फॉर्म अधिकृत संकेतस्थळावरूनदेखील भरता येणार आहे. असाईनमेंट सादर करण्याची अंतिम तारीख देखील 30 एप्रिल पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.