Maharashtra CET 2020 Application Dates कोरोना व्हायरस लॉकडाऊनमुळे लांबणीवर; cetcell.mahacet.org वर पहा संपूर्ण नवं वेळापत्रक
Exam Dates| Image used for representational purpose | (Photo Credits: Unsplash.com)

भारतामध्ये कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. यादरम्यान देशातील सार्‍याच महत्त्वाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. दरम्यान महाराष्ट्रात होणार्‍या सीईटी परीक्षांचेदेखील वेळापत्रक बदलले आहे. सीईटी सेलने आता राज्यातील अनेक प्रवेश प्रक्रियांच्या तारखा देखील पुढे ढकलल्या आहे. दरम्यान परीक्षार्थींसाठी मंडलाच्या अधिकृत वेबसाईटवर त्याच नोटिफिकेशन जारी केलं आहे. दरम्यान नोटिफिकेशनमध्ये दिलेल्या माहितीनुसार आता Maharashtra CET 2020 application dates लॉकडाऊनमुळे लांबणीवर पडल्या आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 14 एप्रिल पर्यंत देशात लॉकडाऊन घोषित केला आहे. MHT CET Exam Date 2020: महाराष्ट्रात सीईटी परीक्षा लांबणीवर; mahacet.org वर लवकरच जाहीर होणार नवं वेळापत्रक.  

मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, प्रवेशअर्ज प्रक्रिया लांबणीवर पडल्याने आता एक्सटर्नल सोर्सच्या द्वारा ऑनलाईन अ‍ॅप्लिकेशन अर्ज दाखल करणार्‍यांना फायदा मिळणार आहे. B.P.Ed., B.Ed. M.Ed., M.P.Ed., B.A/B.Sc. B.Ed. and M.Ed.च्या प्रवेशप्रक्रियांचे अर्ज भरण्याची प्रक्रिया आता लांबणीवर पडली आहे. मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर परिक्षार्थींना रिवाईज्ड शेड्युल पाहता येणार आहे. अधिकृत संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार, परिक्षांसाठी ऑनलाईन अ‍ॅप्लिकेशन करण्याच्या नव्या  तारखेनुसार 20एप्रिल 2020 ही अंतिम तारीख असेल. इथे पहा संपूर्ण नवं वेळापत्रक.

दरम्यान Maharashtra CET ही राज्यातील अनेक महत्त्वाच्या क्षेत्रातील अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा घेते. त्याच्या मार्कांनुसार विद्यार्थ्यांना महाराष्ट्रभर महाविद्यालयांमध्ये अ‍ॅडमिशन दिली जातात. दरम्यान महाराष्ट्र सीईटीने MAH CET MBA/ MMS परीक्षा देखील पुढे ढकलल्या असल्याचं म्हटलं आहे.