गुंतवणूक आणि बचत (Best Savings and Investment) हे दोन वेगळे शब्द आहेत. पण अनेक लोक बहुतांश वेळा ते एकाच अर्थाने वापरतात किंवा समजतात. पण तुम्ही जर तुमची संपत्ती वाढविण्याचा आणि त्याचा योग्य वापर करण्यासाठी अर्थनिती आखत (Best Savings and Investment Strategies) करत असाल. तर, गुंतवणूक (Investment) आणि बचत (Savings) या शब्दांमधला सुक्ष्म फरक आणि ती संकल्पना समजून घेणे आवश्यक आहे. इथे आम्ही बचत आणि गुंतवणुकीमधील फरक आणि त्यात वाढ कशी करायची याबाबत विचार करत आहोत.
बचत म्हणजे काय?
बचत म्हणजे असे पैसे किंवा आर्थिक उत्पन्नातील असा हिस्सा जो प्रत्येक महिना अथवा विशिष्ट कालावधीमध्ये निश्चित रक्कम वेगळी काढली जाते. ही रक्कम बँक, पोस्ट, अथवा इतर ठिकाणी विशिष्ट व्याज अथवा परताव्याच्या रुपात साठवली जाते. इथे साठवली जाणे हे महत्त्वाचे गुंतवणूक नव्हे. बचत ही गुंतवणूकच असली तरीही त्याची संकल्पना वेगळी ठरते. त्यामुळे बचतीला गुंतवणूक म्हणत नाहीत. (हेही वाचा, बचतीसोबतच गुंतवणूक वाढवा, भविष्य सुखकर करा; जाणून घ्या महत्त्वाच्या टीप्स)
बचत ही वेगवेगळ्या माध्यमातून केली जाते. जसे की आपण खरेदी, हॉलिडे, सण, उत्सव साजरे करताना त्यात काटकसर करुन जास्तीत जास्त रक्कम बाजूला काढली जाते. उदा. अनावश्यक खरेदी टाळली जाते, हॉटेलचे खाणे कमी केले जाते. मोबाईल, महागडे कपडे, वाहतूक, मनोरंजन यांसारख्या अनावश्यक वस्तूंचा वापर, त्यावर होणार खर्च टाळला जातो. उरलेली रक्कम साठवली जाते. ही रक्कम बँकांच्या बचत खात्यात साठवली जाते.
गुंतवणूक म्हणजे काय?
गुंतवणूक ही आर्थिक परतावा मिळण्याच्या अपेक्षेने मालमत्तेत पैसे गुंतवण्याची क्रिया आहे. गुंतवणुकीत सामान्यतः स्टॉक, बाँड किंवा इतर आर्थिक साधनांची खरेदी समाविष्ट असते. गुंतवणूक सामान्यत: दीर्घकालीन उद्दिष्टे लक्षात घेऊन केली जाते, जसे की सेवानिवृत्ती किंवा शिक्षण. गुंतवणुकीवरील परतावा हा बचतीवरील परताव्याच्या तुलनेत जास्त असतो, कारण पैसे अतिरिक्त उत्पन्न मिळविण्यासाठी कामाला लावले जातात.
बचत वाढवण्यासाठी बजेट तयार करणे आणि त्यावर चिकटून राहणे महत्त्वाचे आहे. यामुळे पैसे वाचवता येतील आणि बाजूला ठेवता येतील अशी क्षेत्रे ओळखण्यास मदत होईल. याव्यतिरिक्त, बचत खात्यांसाठी जवळपास खरेदी करणे महत्वाचे आहे