Rising Expenses of Education Worries For Parents: शिक्षणावरील वाढता खर्च पालकांसाठी चिंता, Gurugram येथील व्यक्ती X पोस्टमुळे चर्चेत
Education | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

शिक्षणाचा खर्च सतत वाढत (Rising Expenses of Education) आहे. परिणामी पालक, विशेषत: ज्यांची मुले खाजगी संस्थांमध्ये आहेत, शाळेच्या शुल्कातील वार्षिक वाढीबद्दल त्यांच्या चिंता व्यक्त करत आहेत. गुरुग्राम (Gurugram) येथील उदित भंडारी नाम एका पालकाने अशीच भावना सोशल मीडिया मंचर एक्स हँडलवरुन व्यक्त केली. ज्यामुळे ते चर्चेत आले आहेत. भंडारी हे स्वत: गुरुग्राममधील रिअल इस्टेट सल्लागार आहेत. त्यांचा मुलगा इयत्ता तिसरी मध्ये शिक्षण घेत आहे. त्याच्या शालेय प्रवेशासाठी ते दरमहा 30,000 रुपये तरी देखील शाळा प्रशासन शालेय शुल्कात वाढच करत आहे अशी माहिती त्यांनी एक्स पोस्टद्वारे दिली. या पोस्टला वापरकर्त्यांकडून जोरदार प्रतिसाद मिळाला.

उदित भंडारी यांनी मुलांच्या वाढत्या शालेय खर्चाबाबत पालकांच्या मनावर मोठा ताण येत असल्याची भावना व्यक्त केली. त्यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे चिंता व्यक्त करत म्हटले की, शाळेचे शुल्क दरमहा 30,000 रुपये भरूनही, शाळा व्यवस्थापन शुल्क वाढीबाबत कोणतीही पारदर्शकता देत नाहीत. जी दरवर्षी 10% च्या चक्रवाढ दराने कायम आहे. हा ट्रेंड कायम राहिल्यास त्यांचा मुलगा 12वीपर्यंत पोहोचेपर्यंत त्याला वार्षिक अंदाजे 9,00,000 रुपये खर्च करावे लागतील, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. (हेही वाचा, India's first AI teacher: केरळमधील शाळेने लॉन्च केली भारतातील पहिली एआय शिक्षक 'आयरिस' (Watch Video))

एक्स पोस्ट

आपण आपली भावना शालेय व्यवस्थापणापर्यंत पोहोचवली आणि तक्रार करण्याचा प्रयत्न केला तेव्हा शालेय अधिकाऱ्यांनी त्यांची सूचना फेटाळून लावली. तसेच, शैक्षणिक खर्च परवडत नसेल तर त्यांनी आपले पाल्य दुसऱ्या शाळेत घालावे, असा सल्लाही दिला, असे भंडारी यांनी एक्सपोस्टवर म्हटले आहे. भंडारी यांच्या सोशल मीडिया पोस्टला इतर अनेक पालकांनी सहमती दर्शवली. भंडारी यांच्या पोस्टवर आपल्या प्रतिक्रिया देताना बहुतांश पालकांनी विविध शहरांमधील खाजगी शाळांमध्ये भरमसाठ फी वाढीचा सामना केल्याचा अनुभव शेअर केला. वाढत्या शुल्काचे औचित्य किंवा स्पष्टीकरण नसल्याबद्दल अनेकांनी भंडारी यांच्यासारख्याच भावना व्यक्त केल्या. आधीच महागाई आणि वाढत्या राहणीमानाच्या खर्चाने ग्रासलेल्या मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी या उच्च फीचा बोजा विशेषतः आव्हानात्मक आहे.

व्हायरल पोस्टने खाजगी संस्थांमधील शिक्षणाच्या परवडण्याबाबतच्या व्यापक मुद्द्यावर प्रकाश टाकला आहे. ज्यामध्ये कमी होत चाललेली क्रयशक्ती आणि वाढत्या खर्चामुळे घरगुती बजेट कसे कोलमडत आहे, यावर प्रकाश टाकला आहे. पालक शिक्षणात अधिक पारदर्शकता आणि शैक्षणिक खर्च परवडण्यायोग्य असावा अशी मागणी सातत्याने करत आहेत. देशभरातील पालक अशाच प्रकारची भावना व्यक्त करताना दिसतात.