Ratan Tata (Photo Credits: Getty Images)

Chip Assembly Plant in Assam: देशातील सर्वात मोठ्या उद्योगपतींपैकी एक असलेल्या रतन टाटा (Ratan Tata) यांचे स्वदेशी सेमीकंडक्टर चिप (Indigenous Semiconductor Chip) तयार करण्याचे स्वप्न आहे. स्वदेशी सेमीकंडक्टरमुळे भारतासह जगाचे चीनवरील अवलंबित्व कमी होईल. आता ते स्वप्न लवकरच पूर्ण होण्याची शक्यता आहे. कारण आसाम (Assam) मध्ये देशातील पहिल्या सेमीकंडक्टर प्लांट (Semiconductor Plant) चे बांधकाम शनिवारपासून सुरू झाले आहे. ज्यांचे भूमिपूजन मोरीगाव जिल्ह्यातील जागीरोड येथे करण्यात आले. सुमारे 27 हजार कोटी रुपयांच्या या प्लांटमध्ये हजारो लोकांना रोजगार मिळणार आहे. दुसरीकडे, देशात दररोज करोडो सेमीकंडक्टर चिप्स तयार केल्या जातील. याचा अर्थ असा आहे की, सेमी-कंडक्टर चिप उत्पादनात मक्तेदारी असलेले चीन आणि जगातील निवडक देशांवर भारताचे अवलंबित्व संपेल. तसेच काही वर्षांत भारत सेमीकंडक्टर चिप्सचा निर्यातदार होण्याच्या मार्गावर दिसेल.

रतन टाटा या उद्धाटन सोहळ्याला उपस्थित नसले तरी त्यांनी टाटा सन्सचे चेअरमन एन चंद्रशेखरन यांच्या हस्ते त्यांचा निरोपही दिला. ज्यामध्ये त्यांनी या प्लाटसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. आसाममध्ये बनवल्या जाणाऱ्या या प्लांटमुळे देशातील चिपची कमतरता तर पूर्ण होईलच. याशिवाय, राज्यातील नोकऱ्यांची समस्याही सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल. (हेही वाचा -भारतीय बनावटीची पहिली सेमीकंडक्टर चीप डिसेंबर 2024 मध्ये उपलब्ध होणार असल्याची Union Minister Ashwini Vaishnaw यांनी दिली माहिती)

मीडिया रिपोर्टनुसार, टाटा इलेक्ट्रॉनिक्सने शनिवारी आसाममध्ये 27,000 कोटी रुपयांच्या चिप असेंबली प्लांटचे बांधकाम सुरू केले, जे पुढील वर्षी कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे. हा प्लांट सुरू झाल्यानंतर 27,000 नोकऱ्या निर्माण होतील असा अंदाज आहे. शनिवारी भूमिपूजनाच्या दिवशी आसामच्या मुख्यमंत्र्यांसोबत टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन उपस्थित होते. ते म्हणाले की, माजी चेअरमन रतन टाटा यांनी या प्लांटसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. (हेही वाचा -Kaynes Technology Chip Plant: कायन्स टेक्नॉलॉजी 3750 कोटींची गुंतवणूक करून कर्नाटकात उभारणार चिप प्लांट; मिळणार 3200 लोकांना रोजगार)

सेमीकंडक्टर प्लाटमुळे 27 हजार रोजगार निर्माण होणार -

यावेळी बोलताना चंद्रशेखरन म्हणाले की, कंपनीने यापूर्वीच आसाममधील 1,000 लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. येत्या काही दिवसांत हा प्लांट पूर्ण क्षमतेने काम करेल तेव्हा 27 हजारांहून अधिक लोकांना रोजगार उपलब्ध होईल. ज्यामध्ये 15 हजारांहून अधिक प्रत्यक्ष नोकऱ्या निर्माण होतील आणि अप्रत्यक्षरीत्या 12 हजारांहून अधिक नोकऱ्या निर्माण होतील. आम्हाला वेगाने पुढे जायचे आहे. या कारखान्याच्या उभारणीला गती देण्याचा आमचा प्रयत्न आहे. आम्हाला आशा आहे की या प्लांटचे बांधकाम 2025 पर्यंत पूर्ण होईल. (Tesla-Tata Semiconductor Chips Deal: टाटा कंपनी टेस्लासाठी बनवणार सेमीकंडक्टर चिप्स; Elon Musk यांच्या भारतभेटीआधी दोन्ही कंपन्यांमध्ये मोठा करार)

यावेळी आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा म्हणाले की, आसामच्या लोकांसाठी हा 'सुवर्ण दिवस' आहे. बिस्वा यांनी या उपक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि टाटा सन्स लिमिटेडचे ​​आभार मानले. मुख्यमंत्र्यांनी टाटा सन्स लिमिटेडचे ​​अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांना आश्वासन दिले की कंपनीला हा प्लांट उभारण्यात कोणतीही अडचण येणार नाही. तसेच आसामचे लोक त्याबद्दल सदैव ऋणी राहतील.

दररोज अंदाजे 4.83 कोटी चिप्सची निर्मिती होणार -

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव वैष्णव यांनी सांगितले की, प्रकल्प मंजूर झाल्यानंतर अवघ्या पाच महिन्यांच्या अवधीतच प्रकल्प उभारणीचे काम सुरू झाले आहे. या प्लांटमध्ये दररोज अंदाजे 4.83 कोटी चिप्स तयार केल्या जातील. या प्लांटची खास गोष्ट म्हणजे या प्लांटमध्ये वापरलेले तिन्ही प्रमुख तंत्रज्ञान भारतात विकसित करण्यात आले आहे. टाटा प्लांटमध्ये उत्पादित चिप्स इलेक्ट्रिक वाहनांसह विविध वाहनांमध्ये वापरल्या जातील. कम्युनिकेशन आणि नेटवर्क इन्फ्रास्ट्रक्चर, 5G, राउटर्स इत्यादी बनवणारी प्रत्येक मोठी कंपनी या चिप्स वापरणार असल्याचे त्यांनी सांगितले.