प्रतिकात्मक फोटो (File Photo)

रेलटेल कॉर्परेशन ऑफ इंडिया (RailTel Corporation of India Limited)कडून 103 ग्रॅज्युएट्स/ डिप्लोमा इंजिनियर्सना अ‍ॅपरंटशिप ट्रेनिंग़ साठी भरती केले जाणार आहे. हे Apprentice Act 1961 अंतर्गत आहे. दरम्यान इच्छुक उमेदवारांना 4 एप्रिल 2022 पूर्वी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

RailTel (RCIL) Recruitment 2022 साठी जारी करण्यात आलेल्या नोटिफिकेशनमध्ये उमेदवाराला विशिष्ट शैक्षणिक पात्रतेची गरज आहे. यामध्ये 4 वर्षांचे इंजिनियरिंगचे शिक्षण पूर्ण केलेले असावे. 22 मार्चपासून सुरू झालेली अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया 4 एप्रिल पर्यंत सुरू राहणार आहे. mhrdnats.gov.in वर उमेदवार ऑनलाईन अर्ज दाखल करू शकतात. हे देखील नक्की वाचा: MPSC Recruitment 2022: Assistant Commissioner, Health Officer सह विविध पदांवर 168 जागांसाठी होणार नोकर भरती; mpsc.gov वर करा अर्ज .

इथे पहा सविस्तर नोटिफिकेशन

इथे पहा ऑनलाइन अर्जाची लिंक

इलेक्ट्रॉनिक्स, टेलीकम्युनिकेशन, कम्युटर सायन्स, सिविल इंजीनियरिंग, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजीनियरिंगचे विद्यार्थी पात्र असणार आहेत. दरम्यान उमेदवाराचे वय 18 ते 27 वर्ष असणं आवश्यक आहे. उमेदवारांची निवड मुलाखतीच्या माध्यमातून होणार आहे.

निवड झालेल्यांना महिन्याला 14 हजार पगार (पदवीधर इंजिनियर) आणि डिप्लोमा इंजिनियर्सना 12 हजार प्रतिमहिना पगार दिला जाणार आहे.