Job ( Photo Credit - File Image)

एमपीएससी (MPSC) कडून काही ठिकाणी नोकरभरती जाहीर करण्यात आली आहे. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अधिपत्याखालील अन्न व औषध प्रशासन यांच्या आस्थापनेवरील सहायक आयुक्त (औषधे), गट अ, सहायक आरोग्य अधिकारी, गट अ, सांख्यिकी अधिकारी, गट ब, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी, गट ब, प्रशासकीय अधिकारी, गट ब, सहायक संचालक, उपवने व उद्याने, गट ब या पदांसाठी सुमारे 168 जागांवर ही नोकरभरती होणार आहे. त्यासाठी नोटिफिकेशन देखील जारी करण्यात आली आहे. ऑनलाईन माध्यमातून इच्छुक उमेदवार 10 एप्रिल 2022 पर्यंत आपले अर्ज दाखल करू शकणार आहेत. mpsc.gov या संकेतस्थळावर हे ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत.

नोटिफिकेशन नुसार या भरती प्रक्रियेमध्ये सहायक आयुक्त (औषधे) गट अ साठी 15 जागा आहेत. सहायक आरोग्य अधिकारी गट अ साठी 7 जागा आहेत. सांख्यिकी अधिकारी गट ब साठी 23 जागा आहेत. जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी गट ब साठी 49 जागा आहेत. प्रशासकीय अधिकारी गट ब साठी 73 जागा आहेत. सहायक संचालक उपवने व उद्याने गट ब साठी 1 जागा आहेत. प्रत्येक पदासाठी शैक्षणिक पात्रता आणि निकष वेगवेगळे आहेत. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी एकदा परिपत्रक नीट पहाणं आवश्यक आहे.

इथे पहा नोटिफिकेशन्स

सहायक आयुक्त (औषधे) गट अ नोटिफिकेशन  इथे क्लिक करा.

सहायक आरोग्य अधिकारी गट अ नोटिफिकेशन  इथे क्लिक करा.

सांख्यिकी अधिकारी गट ब नोटिफिकेशन-इथे क्लिक करा.

जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी गट ब नोटिफिकेशन  इथे क्लिक करा.

प्रशासकीय अधिकारी गट ब नोटिफिकेशन इथे क्लिक करा.

सहायक संचालक उपवने व उद्याने गट ब  नोटिफिकेशन  इथे क्लिक करा.

दरम्यान अर्ज करताना खुल्या प्रवर्गासाठी - 719/- रुपये आणि मागासवर्गासाठी - 449/- रुपये प्रवेश शुल्क आकारले जाणार आहे. उमेदवारांसाठी पगाराची पे स्केल Rs.41800-208700/ असणार आहे.