NEET Result 2020 मध्ये आधी नापास नंतर ST कॅटेगरी मध्ये अव्वल आल्याचा दावा खोटा; NTA ने वृत्त फेटाळत फेक न्यूज पसरवल्याबद्दल FIR दाखल करणार असल्याची दिली माहिती
Online | Photo Credits: Pixabay.com

NEET Results 2020 Blunder: यंदा कोरोना संकटाच्या सावटाखाली देशात यंदाच्या वर्षाच्या सार्‍या परीक्षा पार पडल्या आहेत. दरम्यान काही दिवसांपूर्वीच यावर्षी 2 वेळेस नीट 2020 परीक्षा घेऊन 16 ऑक्टोबरला निकाल जाहीर झाले आहेत. या निकालामध्ये राजस्थानच्या मृदुल रावत (Mridul Rawat) याने आधी त्याला नापास आणि पेपर रिचेकिंग नंतर देशात एसटी कॅटेगरी (ST Category )मध्ये अव्वल असल्याचा दावा करण्यात आल्याचं वृत्त व्हायरल झालं आहे. मात्र NTA ने वृत्त फेटाळले आहे. ही चूकीची, खोटी आणि एकतर्फी बातमी चालवल्याने एनटीए ने देखील संताप व्यक्त करत पालकांना, विद्यार्थ्यांना फेक न्यूजपासून (Fake News) सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. तसेच याप्रकरणी एफआयआर (FIR) दाखल करणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.

दरम्यान राजस्थानच्या सवाई माधवपूर येथील गंगापूरचा रहिवासी मृदुल रावत याने केलेल्या दाव्यानुसार त्याला नीट 2020 परीक्षेमध्ये 720 पैकी केवळ 329 मार्क्स दाखवण्यात आले. मात्र हा निकाल चूकीचा आहे. त्याला रिचेकिंगनंतर 650 मार्क्स आहेत. याबाबत त्याने एनटीएला देखील ट्वीट करून कळवले. दरम्यान हे वृत्त अनेक प्रादेशिक आणि राष्ट्रीय वृत्त वाहिन्यांनी, वृत्तपत्रकांनी चलावलं. सोशल मीडीयामध्येही त्याची चर्चा झाली. पण प्रत्यक्षात असे काहीच झालेले नाही. एनटीने यंदा निकाल पूर्ण जबाबदारीने लावले असल्याचा दावा केला आहे. NEET 2020 Merit List: नीट युजी परीक्षा निकाल आणि AIR Merit List कशी पहाल ntaneet.nic.in वर ऑनलाईन.

भारतामध्ये वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय पदवी प्रवेशासाठी दरवर्षी एनटीए नीट युजी 2020 परीक्षा घेते. या परीक्षेच्या निकालावर देशातील 15 AIIMS आणि 2 JIPMER मेडिकल कॉळेजमध्ये प्रवेश दिला जातो. यंदा ओडिशाचा Soyeb Aftab आणी दिल्लीची आकांक्षा सिंग या दोन विद्यार्थ्यांनी 720 पैकी 720 गुण मिळवत घवघवीत यश मिळवलं आहे. अशाप्रकारे पैकीच्या पैकी कामगिरी करणारे हे दोन पहिलेच विद्यार्थी आहेत.