बारावीची परीक्षा आणि निकाल हा जीवनाला कलाटणी देणारा क्षण असतो. याच परीक्षेच्या मार्कांवर भविष्य अवलंबून असते. मात्र याच प्रगतीपुस्तकावर ‘अनुत्तीर्ण’ (Fail) असा शेरा मिळाल्यास? वाईट तर वाटेलच ना. यामुळे अनेक विद्यार्थी शिक्षणाचा मार्गही सोडून देतात. मात्र आता 12 वीच्या गुणपत्रिकेवरील ‘अनुत्तीर्ण’ शब्द काढण्याचा शालेय शिक्षण विभागाने महत्वाचा निर्णय घेतला आहे.
फेब्रुवारी-मार्च 2020 च्या आणि जुलै-ऑगस्ट च्या पुरवणी परीक्षेपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. त्याऐवजी पुनःपरीक्षेसाठी पात्र (Eligible for Re-Exam) असा शेरा दिला जाणार आहे.
१२ वीच्या गुणपत्रिकेवरील अनुत्तीर्ण शब्द काढण्याचा शालेय शिक्षण विभागाचा निर्णय. फेब्रुवारी-मार्च २०२० च्या आणि जुलै-ऑगस्ट च्या पुरवणी परीक्षेपासून होणार अंमलबजावणी. pic.twitter.com/AJjBOR1LYw
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) February 20, 2020
दहावीच्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर अनुत्तीर्ण हा शब्द न यापरता, विद्यार्थी पुरवणी परिक्षेत श्रेणी विषयासह तीन किंवा त्यापेक्षा अधिक विषयात अनुतीर्ण असल्यास 'एलिजिबल फॉर ओन्ली स्कील डेव्हलपमेंट प्रोग्राम' असा शेरा देण्यात येतो. याच धर्तीवर ही गोष्ट 12 वीसाठी सुरु करण्यात येणार आहे. सरकारने अशा विद्यार्थ्यांसाठी 'कौशल्य सेतू कार्यक्रम' योजना सुरू केली आहे. या योजनेनुसार, अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना कौशल्य प्रशिक्षण देणे, विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करुन देऊन रोजगार मिळवण्याची क्षमता निर्माण केली जाणार आहे. (हेही वाचा: उत्तर प्रदेश: चक्क मुख्याध्यापकानेचं विद्यार्थ्यांना दिला कॉपी करण्याचा सल्ला; पहा व्हिडिओ)
विद्यार्थी नियमित परीक्षेत श्रेणी विषयासह एक किंवा दोन विषयात अनुत्तीर्ण अस, विद्यार्थी नियमित परीक्षेत श्रेणी विषयासह तीन किंवा त्यापेक्षा जास्त विषयात अनुत्तीर्ण असल्यास तसेच विद्यार्थी श्रेणीविषयासह एक किंवा दोन विषयांत श्रेणी विषयासह अनुत्तीर्ण असल्यास पुनःपरीक्षेसाठी पात्र असा शेरा दिला जाणार आहे. तर श्रेणीविषयासह तीन किंवा त्यापेक्षा अधिक विषयात अनुत्तीर्ण असल्यास कौशल्य विकास अभ्यासक्रमासाठी पात्र हा शेरा दिला जाणार आहे.